शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

सुरक्षेच्या दृष्टीने अर्धा तास केंद्रावरच थांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:20 IST

गोंदिया : काही गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी कोरोनाची लस घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांशी बोलून घ्यावे एवढीच काळजी घेण्याची गरज आहे. ...

गोंदिया : काही गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी कोरोनाची लस घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांशी बोलून घ्यावे एवढीच काळजी घेण्याची गरज आहे. याशिवाय सर्वांसाठी कोरोनाची लस सुरक्षित आहे व तसे आतापर्यंतच्या अभ्यासातून निष्पन्नही झाले आहे. मात्र काही व्यक्तींना लसीची ॲलर्जी असते किंवा काही व्यक्तींना लस घेतल्याने रिॲक्शन होते असे प्रकार घडतात. यात कोरोना लसीमुळेच त्यांच्यासोबत असे होणे शक्य नसून अन्य औषध किंवा लसींमुळेही तसे होते. यामुळेच नागरिकांना लस घेतल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने केंद्रातच अर्धा तास थांबून राहण्यास सांगितले जाते. यासाठी केंद्रात बसण्याची व बेडचीही व्यवस्था केली जात आहे. मात्र काही व्यक्ती आम्हाला काहीच होत नाही असा आव आणून लस घेतल्यानंतर लगेच निघून जातात. मात्र कित्येकदा काही व्यक्तींना लस घेतल्यानंतर भोवळ येणे, डोकेदुखी, मळमळ, अंगावर खाज, श्वास घेण्यास त्रास होणे असे रिॲक्शन होतात. जास्तच झाल्यास व्यक्ती बेशुद्धही पडू शकते. अशात त्या व्यक्तीला लगेच दुसरे औषध किंवा लस द्यावी लागते. केंद्रातून बाहेर पडल्यावर असले प्रकार घडून संबंधितांची धावपळ होऊ नये किंवा काही धोका होऊ नये यासाठीच केंद्रात अर्धा तास बसणे गरजेचे आहे.

--------------------------------------

आतापर्यंत झालेले लसीकरण

एकूण लसीकरण - ३,५०,६५२

पहिला डोस- २,६७,९४६

दुसरा डोस- ८२,७०६

एकूण लसीकरण केंद्र- १९०

३०-६० वयोगटासाठी केंद्र- १९०

------------------------------

लसीकरणानंतर अर्धा तास कशासाठी ?

कोरोनाची लस अत्यंत सुरक्षित असून त्यामुळे आतापर्यंत कुणालाही काही त्रास झाल्याची तक्रार आलेली नाही. तरीही काही व्यक्तींना लस घेतल्यानंतर डोकेदुखी, अंगावर खाज, मळमळ, भोवळ येणे यासारखे रिॲक्शन होतात. मात्र काही वेळापुरतेच असतात. एखाद्या व्यक्तीला काही जुना त्रास असल्यास किंवा लसींची रिॲक्शन असल्यास ते बेशुध्द होऊ शकतात किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. अशात त्या व्यक्तीला लगेच दुसरे औषध किंवा लस द्यावी लागते. आता लस घेऊन बाहेर गेल्यावर असे काही घडल्यास धोका होण्याची शक्यता असते. म्हणूनच लस घेतल्यानंतर अर्धा तास थांबणे अधिक गरजेचे आहे.

- डॉ. नितीन कापसे

जिल्हा आरोग्य अधिकारी

-----------------------------------

लस हेच आहे औषध

कोरोनाला मात देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लसी अत्यंत सुरक्षित असून, त्यांच्या संपूर्ण चाचण्या करूनच वापराला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र काही व्यक्तींना लस घेतल्यानंतर डोकेदुखी, मळमळ, भोवळ व अंगदुखी तसेच ताप येण्यासारखे त्रास होतात. मात्र हे काही वेळापुरतेच राहत असून यापासून घाबरण्याची गरज नाही. साधी तापाची गोळी घेऊनही व्यक्ती बरा होतो. कारण कोरोनाशी लढण्यासाठी असलेली ही लस या सर्व तक्रारींवरही औषधाचे काम करते.

-------------------------------------

कोरोनावर लगाम लावण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लसींची परिणामकारकता दुसऱ्या लाटेत दिसून आली आहे. त्यामुळे आता कोरोनाला पुढे नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वांनी लस घ्यावी. कोरोनाची ही लस अत्यंत सुरक्षित असून, कुणीही आपल्या मनात भीती व भ्रम न बाळगता लस घ्यावी. हे तुमच्यासाठी व तुमच्या कुटुंबीयांसाठी गरजेचे आहे.

- डॉ. अमरीश मोहबे

जिल्हा शल्य चिकित्सक