शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
3
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
4
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
5
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
6
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
7
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
8
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
9
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
10
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
11
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
12
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
13
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
14
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
15
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
16
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
17
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
18
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
19
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
20
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?

जिल्ह्यात आजपासून सायबर लॅब सुरू

By admin | Updated: August 15, 2016 00:09 IST

जिल्ह्यातच नव्हे तर अख्या महाराष्ट्रात सायबर क्राईमच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे.

गुन्ह्यांवर घालणार वचक : पत्रपरिषदेत पोलीस अधीक्षक भूजबळ यांची माहिती गोंदिया : जिल्ह्यातच नव्हे तर अख्या महाराष्ट्रात सायबर क्राईमच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. त्यावर आळा घालण्यासाठी व पोलीस विभागातील कुशल मनुष्यबळ पुढे येण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एकाचवेळी राज्यात ४४ ठिकाणी सायबर लॅब सुरू केल्या आहेत. त्यातील गोंदिया येथील सायबर लॅबचे काम पूर्ण झाले असून १५ आॅगस्ट रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते या लॅबचे विधीवत उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भूजबळ यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात रविवारी (दि.१४) आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी पोलीस विभागासंबंधी विविध विषयांवर माहिती दिली. शहरात बिट पोलिसिंग कार्यपद्धती राबविणार असून सिव्हिल लाईन, छोटा गोंदिया, मार्केट परिसर व सावराटोली असे चार बिट. रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत सूर्याटोला, रेलटोली, कुडवा, बसंतनगर. गोंदिया ग्रामीणमध्ये फुलचूर, कारंजा व रावणवाडीमध्ये एअरपोर्ट बिट तयार करण्यात येणार आहे. दर्शनी ठिकाणी बिट चौकी तयार करण्यात येणार आहे. महिला अत्याचारांवर आळा घालण्यासाठी दोन निर्भय पथके तयार करण्यात आली आहे. सोबतच बिट मार्शल पथकाचेही पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले. शहरात चार ठिकाणी ट्रॉफिक सिग्नल आहेत. परंतु कुडवा नाका, फुलचूर, मरारटोली, पतंगा मैदान चौक, कारंजा टी-पॉर्इंट, राणी अवंतीबाई चौक, गोंदिया पब्लिक स्कुल टी-पार्इंट या सात ठिकाणी ट्राफीस सिग्नल लागणार आहेत. शहरात एकेरी वाहतूक व नो-पार्किंगच्या सुचना देण्यात येणार आहेत. नगर परिषद, महसुल विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने वाहतुकीची समस्या सोडविण्यात येणार आहे. राज्यात गोंदिया वगळता सर्व ठिकाणी सुरक्षा पथक आहेत. विद्यार्थ्यांना शालेय जिवनातच रस्ता सुरक्षेचे नियम माहिती व्हावे यासाठी सुरक्षा पथक असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पाच शाळा व गोंदिया शहरातील दहा शाळांमध्ये सुरक्षा पथकासाठी पायलट प्रोजेक्ट तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ५० शाळांमधील दोन शिक्षकांना आरएसपी अधिकारी म्हणून प्रशिक्षण दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगीतले. तसेच जिल्ह्यातील भूमाफिया व वाळू तस्करांसंदर्भात जनतेचा वाढणारा असंतोष पाहून या माफीयांवर कारवाई करण्यासाठी महसूल, जिल्हा भूमिअभिलेख, ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगर परिषद व पोलीस यांची समन्वयक समिती करुन रेती चोरणाऱ्यांचे छायाचित्र, सीसीटिव्ही कॅमेरे टिपणार आहे. जिल्ह्याच्या सर्व सिमांवर चेक पोस्ट उभारण्यात येणार आहे. पोलिसांच्या कामाविषयी जनजागृती करण्यासाठी १७ प्रकारच्या चलचित्रफित तयार करण्यात आल्या आहेत. महिला अत्याचारांसाठी मदत म्हणून प्रतिसाद अ‍ॅप, वाहन चोरीसाठी चोरी डॉट कॉम साफ्टवेअर अपलोड केला आहे. जिल्ह्यात सहा हजारापेक्षा जास्त पोलीस मित्र तयार करण्यात आले आहे. गोंदिया जिल्ह्यात गंगाझरी, रामनगर, गोंदिया शहर व गोंदिया ग्रामीण या चार पोलीस ठाण्यात सिसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)