शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

खासगी तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा प्रारंभ

By admin | Updated: May 5, 2017 01:43 IST

जलयुक्त शिवार अभियान २०१६-१७ मध्ये करडगाव-झरपडा गावाची निवड करण्यात आली होती.

ुेबोंडगावदेवी : जलयुक्त शिवार अभियान २०१६-१७ मध्ये करडगाव-झरपडा गावाची निवड करण्यात आली होती. गावातील खासगी तलावातील गाळ काढण्याचा उपक्रम तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येत आहे. गावातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये गाळ काढण्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. महात्मा फुले जलभूमी संधारण अभियान करडगाव-झरपडा येथील खासगी तलावातील गाळ काढण्याच्या कामाच्या शुभारंभाप्रसंगी तालुका कृषी अधिकारी डी.एल. तुमडाम, मंडळ कृषी अधिकारी एन.एच. मुनेश्वर, कृषी पर्यवेक्षक आर.के. चांदेवार, करडगावचे सरपंच आनंदराव मेश्राम, झरपडाचे सरपंच नामदेव परशुरामकर, बोळदेचे सरपंच उदाराम मुंगमोळे, प्रगतीशील शेतकरी सुदाम डोंगरवार, विनायक मस्के, डॉ. गजाान डोंगरवार, दुर्वास मस्के, बन्सीधर लंजे, माधोराव मस्के, गुलाब लंजे, दिगंबर मस्के आदी शेतकरी उपस्थित होते. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने खासगी तलावातील जेसीपी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने लोकसहभागातून गाळ काढण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावामध्ये कृषी विभागाच्या वतीने पाण्याचा संचित साठा मोठ्या प्रमाणात वाढावा म्हणून विविध शेतकरी हिताच्या कामाला मोठ्या प्रमाणात गती देण्यात आली. यंत्राच्या सहाय्याने तलावातील काढलेला गाळ शेतकरी आपापल्या शेतामध्ये नेवून भात खाचराची कामे झालेल्या बांध्यामध्ये पसरवित आहेत. तलावातील निघालेला गाळ जमिनीमध्ये काही प्रमाणात सुपिकता वाढवितो. तलावातील निघालेला गाळ पाळ मजबुतीकरण करण्यासाठी टाकल्या जातो. पाळीवर माती टाकल्यामुळे तलावामध्ये पाण्याचा अतिरिक्त साठा वाढून जलसिंचन क्षेत्रात २५ टक्के वाढ होण्याचा मनोदय तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी हितगुज साधताना व्यक्त केला. तलावातील गाळ काढण्याच्या उपक्रमात करडगाव-झरपडा येथील शेतकरी बांधव मोठ्या तळमळतेने सदर कामात सहभागी होत आहेत. जलयुक्त शिवार अभियानामुळे गावात हरितक्रांतीची लाट पसरेल, अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली. संचालन कृषी सहाय्यक अविनाश हुकरे यांनी केले. (वार्ताहर)