शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

कुंभीटोला येथील आठवडी बाजार सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:31 IST

बाराभाटी : लगतच्या ग्राम कुंभीटोला येथील बाजार कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना बाजार करण्यासाठी अन्यत्र ...

बाराभाटी : लगतच्या ग्राम कुंभीटोला येथील बाजार कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना बाजार करण्यासाठी अन्यत्र जावे लागत असल्याने आठवडी बाजार सुरू करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

या परिसरातील आजूबाजूच्या गावातील अनेक नागरिक हे लांब अंतरावर बाजाराला जातात. अनेक भाजी विक्री करणारे व्यावसायिकसुद्धा बाजाराच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच लहानसहान धंदा करणारे व्यावसायिकसुद्धा रोजगार मिळेल, याची वाट बघत आहे. जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असून, शासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. अशात कुंभीटोला येथील आठवडी बाजार सुरू करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

--------------------

व्यवसायांसह अनेक ठिकाणचे बाजारही सुरू झाले आहेत. राज्य शासनाने निर्बंध शिथिल केले असून, जिल्हयातही कोरोना नियंत्रणात असल्याने कुंभीटोला येथील आठवडी बाजार सुरू करावा.

- धम्मदीप हिरामण मेश्राम,

(बोळदे)

==============

आठवडी बाजार बंद असल्यामुळे आमच्या हातचा रोजगार गेला आहे. आता सर्व काही सुरू झाले असताना, कुंभीटोला येथील आठवडी बाजार सुरू करून आमच्या व्यवसायाला चालना द्यावी.

आर. एस. शेंडे, भाजीपाला विक्रेता (बाराभाटी)