शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दुधात भेसळ सुरूच

By admin | Updated: June 12, 2017 01:30 IST

या धावपळीच्या युगात जो तो कमीत कमी श्रम करुन लवकर कसे श्रीमंत होता येईल यासाठी धडपडत असल्याचे चित्र दिसत आहे.

दुर्लक्ष : अन्न व औषध प्रशासन विभागाचेलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: या धावपळीच्या युगात जो तो कमीत कमी श्रम करुन लवकर कसे श्रीमंत होता येईल यासाठी धडपडत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र अधिक नफा मिळविण्याच्या भारात आपण आपल्याच लोकांच्या जीवनाशी खेळ करित आहोत ही बाब कदाचित विसरली जात आहे. दैनंदिन जिवनात प्रत्येकाची गरज असलेल्या दुधामध्ये रासायनिक द्रव्यांची भेसळ केली जात असल्याचे प्रकार अनेकदा सामोर आले आहे. मात्र अन्न व औषध प्रशासन विभागाकडून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे दिसून येते. दूध हा प्रत्येकाच्या दैनंदिन वापरातील पदार्थ आहे. प्रत्येकाच्या दिवसाची सुरूवात देखील दुधापासून तयार केलेल्या चहानेच होते. तसेच डॉक्टर देखील आजारी असलेल्या रुग्णांना व लहान मुलांना दूध पिण्याचा सल्ला देतात. दुधामध्ये असलेले प्रथिने मानवी आरोग्यकरिता लाभदायक असतात.दुधाच्या पावित्रामुळेच दुधाला पुजा, होमहवन यामध्ये उपयोग केला जातो. मात्र सध्या मिळणाऱ्या दुधाच्या शुध्दीकरणावर त्यातील भेसळीमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आपण दररोज सेवन करित असलेल्या दुधामध्ये प्रथिने कमी व भेसळ युक्त पदार्थांचा वापर अधिक प्रमाणत केल्या जात असल्याचे प्रकार बऱ्याच ठिकाणी उघडकीस आले आहे. काही दूध विक्रेत्यांनी दुधामध्ये भेसळ करुन विक्री करण्याला आपला व्यवसाय केला आहे. हा व्यवसाय करताना आपण आपल्याच लोकांच्या जीवनाशी खेळ करित असल्याची बाब ही ते विसरत चालले आहे. अन्न औषध व प्रशासन विभागाने जिल्ह्यात अनेक दूध डेअरी व खोवा तयार करणाऱ्यांवर धाड टाकून दोन तीन हजार किलो भेसळयुक्त खोवा जप्त केला होता. तर गोंदिया शहरातील एका दूध विक्रेत्यांच्या घरी शहर पोलिसांनी धाड टाकून हजारो लिटर भेसळ युक्त दूध जप्त केले होते. सदर दुधविक्रेत्यांच्या घरून सॉकरीन, मॉल्टोवेट पावडर, कपडे धुण्याचे पावडर,शॉम्पू, फोटो धुण्याचे रसायनाचा मोठ्या प्रमाणात साठा सापडला होता. सदर दूध विक्रेत्याने हे सर्व पदार्थ दुधामध्ये भेसळ करित असल्याचे सांगितले होते. या पदार्थाच्या भेसळीमुळे दुधाची डिग्री व फॅट वाढविली जाते. याचबरोबर यामध्ये युरिया मिक्स करुन रासायनिक दूध देखील तयार केले जाते.हे रासायनिक दूध शुध्द दुधासारखे दिसते व त्याची चव देखील सारखीच असते. त्यामुळे कुणीही सदर दूध भेसळयुक्त असल्याची कल्पना करु शकत नाहीत. दुधामध्ये या रासानिक पदार्थांची भेसळ केल्याने दूध विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणात नफा मिळते व रासानिक पदार्थांची किमत देखील कमी असल्याने आणि ते बाजारपेठेत सहज उपलब्ध होत असल्याने मोठ्या प्रमाणात दुधाची भेसळ केली जाते. हा प्रकार जिल्ह्यातही अजुनही बिनधास्तपणे सुरूच आहे. मात्र असे एखादे प्रकरण उघडकीस आले की अन्न औषध व प्रशासन विभाग त्यांच्यावर कारवाई करते. मागील पाच ते सहा महिन्याच्या कालावधीत एकाही दूध विक्रेत्यावर कारवाई करण्यात आल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे दूधभेसळ खोरांची हिम्मत वाढत चालली आहे. मात्र यामुळे मानवी आरोग्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे. आपण नकळत जहर सेवन करित आहोत याची थोडीशी कल्पनाही या भोळ्या लोकांना नसते. दुधामध्ये भेसळ करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.