शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

कर्मचाºयांच्या संपाने प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 22:02 IST

एसटी कर्मचाºयांचे मागील तीन दिवसांपासून संप सुरु आहे. शुक्रवारी संपाचा चौथा दिवस होता. शासन आणि एस.टी.कर्मचारी यांच्यात मागण्यांवरुन चर्चा फिस्कटली.

ठळक मुद्देसर्व गाड्या बसस्थानकात जमा : काळपिवळी चालकांची मनमानी

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : एसटी कर्मचाºयांचे मागील तीन दिवसांपासून संप सुरु आहे. शुक्रवारी संपाचा चौथा दिवस होता. शासन आणि एस.टी.कर्मचारी यांच्यात मागण्यांवरुन चर्चा फिस्कटली. त्यामुळे हा संप चिघळला आहे. दरम्यान दिवाळीच्या कालावधीत या संपामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.स्थानिक आगारातील चालक, वाहक इतर कर्मचारी संपात सहभागी झाल्याने प्रवाश्यांची फारच गैरसोय होत आहे. दिवाळी व भाऊबिजनिमित्त बाहेरगावी जातात. ग्रामीण भागात एसटीच प्रवासाचे साधन असून प्रवाशांच्या सोयीचे आहे. मात्र गेल्या तीन दिवसांपासून एसटी कर्मचाºयांचा संप सुरू असल्याने त्याचा फटका ग्रामीण भागातील प्रवाश्यांना बसत आहे.तिरोडा आगारातील ७४ वाहक, ७० चालक, तांत्रिक सहायक २५, इतर ३२ असे २०१ कर्मचारी संपात सहभागी असल्याचे सांगण्यात आले. तसेच अकोला, पुसद, आकोट, नागपूर, माहूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया या ठिकाणी गेलेले ८ चालक, ८ वाहक त्या ठिकाणीच गाडीसोबत अडकून पडलेले आहेत. संपाला कर्मचाºयांनी शंभर टक्के पाठींबा दर्शविला असून तिरोडा आगारातील सर्व ४४ गाड्या आगारात जमा करण्यात आल्या आहेत. एसटी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, यासह विविध मागण्यासाठी कर्मचाºयांनी संप पुकारला आहे. त्यात विविध संटघटना व कृती समितीच्या पदाधिकाºयांचा सहभाग आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत संप मागे घेणार नसल्याचे कर्मचाºयांनी सांगितले. एसटी कर्मचाºयांच्या मंडपाला तालुका काँग्रेस अध्यक्ष राधेलाल पटले यांनी भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. संपात संघटनेचे पदाधिकारी, कृती समितीच अध्यक्ष कलाम बाबा शेख, सदस्य असीम खान, हंसराज वैद्य, शिवकुमार कनोजे, ओमप्रकाश कावळे, विनायक मारकंड, राजू टेकाम, दत्ता बकरे, पाडुरंग शेंडे, एजाज खान पठान, शामा गाते, दिपक चौधरी, नरेश तिडके, राजेश झगेकार, विलास चव्हाण, महेश सपाटे, गणेश टेंभरे, सादिक पठान, अनिल सार्वे, नाशिक मेश्राम सहभागी झाले आहेत.गोंदिया आगारातील बस सेवा ठप्पचराज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांनी १६ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपाला गोंदिया आगारातील कामगारांनीसुद्धा १०० टक्के पाठींबा दिला आहे. शुक्रवार (दि.२०) संपाच्या चौथ्या दिवशीसुद्धा गोंदिया आगारातील कामकाज बंदच होते. वाहक, चालक, यांत्रिक आदी सर्व कामगार संपात सहभागी झाले असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संप सुरूच राहील, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी ये-जा करणाºया प्रवाशांना मोठाच मनस्ताप होत आहे. काळीपिवळी वाहनधारकांनी चांगलीच चांदी झाली आहे. एसटी बंदमुळे प्रवासी आता मिळेल त्या साधनाने आपला प्रवास करीत आहेत.संपाकडे विद्यार्थ्यांच्या पालकांचे लक्षसुदैवाने दिवाळीनिमित्त शाळांना सुट्टी असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर संपाचा परिणाम झाला नाही. अन्यथा मानव विकास कार्यक्रमांतर्गत धावणाºया ‘स्कूल बसेस’ बंदचा फटका विद्यार्थ्यांच्या विद्यार्जनावर पडला असता व त्यांचे शाळेत ये-जा करणे बंद झाले असते. एका आठवड्यानंतर शाळा सुरू होणार आहेत. जर एसटी कामगारांचा संप असाच सुरू राहिला तर ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात येणाºया विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांची मोठीच गैरसोय होणार आहे. विशेष म्हणजे एसटी कामगारांचा संप कधी मार्गी लागतो याकडे आता विद्यार्थ्यांच्या पालकांसह, व्यापारी, मंडईनिमित्त इतरत्र जाणारे प्रवासी आदी सर्वांचेच लक्ष लागले आहे.