शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
4
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
5
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
6
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
7
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
8
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
9
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
10
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
11
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
12
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
13
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
14
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
15
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
16
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
17
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
18
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
19
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
20
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू

रेतीसाठ्याकडे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:28 IST

एटीएम होताहेत कोरोना संसर्गाचे केंद्र गोंदिया : कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, बँका, तसेच एटीएम केंद्रांवर सॅनिटायझर, तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे ...

एटीएम होताहेत कोरोना संसर्गाचे केंद्र

गोंदिया : कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, बँका, तसेच एटीएम केंद्रांवर सॅनिटायझर, तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. मात्र, या निर्देशांचे पालन केले जात नाही. नागरिक या उपाययोजनांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता

गोंदिया : शहरातील उपमुख्य रस्त्यांवर अनेक खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. काही खड्ड्यांमध्ये भर घालण्यात आली असली, तरी हे साहित्य रस्त्यावर पसरले आहे. त्यामुळे रस्ते अरुंद होत आहेत. येण्या-जाण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. याकडे नगरपरिषदेने लक्ष देऊन खड्डे त्वरित बुजवावे, अशी मागणी होत आहे.

प्लास्टीक पिशव्यांचा वापर वाढला

गोंदिया : शहरासह जिल्ह्यात प्लास्टीक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, सगळीकडे प्लास्टीकचा कचरा दिसत असून, शासनाच्या आदेशाला तिलांजली मिळत आहे. प्रदूषणात होणारी वाढ थांबविण्यासाठी प्लास्टीक पिशव्या बंद करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला. त्यानुसार, ५० मायक्रॉन्सपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

महामार्गावरील अंडरपास मार्ग प्रलंबित

सडक अर्जुनी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६ वरील डोंगरगाव डेपो, सशीकरण पहाडी व डुग्गीपार परिसरात विविध जातींच्या वन्यजीव प्राण्यांना रस्ते अपघातात नेहमीच जीव गमवावा लागतो. याकरिता अंडरपास मार्गाची मागणी केली जात आहे. हा रस्ता प्रलंबित असल्याने मात्र वन्यजीवांना नाहक जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे अंडरपास मार्ग लवकरात लवकर तयार करावा.

बनगाव येथे घाणीचे साम्राज्य

आमगाव : बनगाव येथील वाॅर्ड क्रमांक ६ मधील नहर रोड, अनिहानगर व कामठा रोड परिसरात कचरापेटी नसल्याने घाण पसरली आहे. परिसरात जागोजागी कचऱ्याचे ढीग जमा झाले असून, कचरापेटी लावण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. परिसरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने सर्वत्र घाण पसरली असून, नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.

ग्रामीण कारागीरांवर उपासमारीचे संकट

सालेकसा : जागतिकीकरणामुळे विविध आधुनिक साहित्य उपलब्ध होत आहे. ओघानेच आधुनिक केरसुनीमुळे पारंपरिक झाडू व्यवसाय हद्दपार होण्याच्या मार्गावर आला असल्याचे दिसत आहे.

दुग्ध भेसळीच्या चौकशीची मागणी

सौंदड : दुधाची आवक कमी होऊनही दुधाचे वितरण व दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करण्यात येत आहे. दुधात भेसळ करून पदार्थ तयार करण्याच्या सपाटा सुरू आहे. याची चौकशी करण्याची मागणी आहे.

शेंडा परिसरात नेटवर्कची समस्या

सडक -अर्जुनी : तालुक्यातील ग्राम कन्हारपायली, शेंडा, आपकरीटोला, उशिखेडा, पाटीलटोला, लेंदीटोला, मोहघाटा, दल्ली, लेंडीटोला, हलबीटोला, पांढरी मोबाइल टॉवर नसल्याने ग्राहकांची अडचण होते.

अल्प खर्चाचे शुभमंगल प्रेरणादायी

गोरेगाव : कोरोनामुळे विवाह समारंभावरही बंधने आली आहेत. थेट आठ महिन्यांपासून बंद असलेली सामाजिक परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेली विवाह परंपरा सुरू झाली आहे.

कचरापेट्यांकडे होत आहे दुर्लक्ष

केशोरी : स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा इतरत्र पडून राहू नये, यासाठी चौकाचौकांत कचरापेटा बसविण्यात आल्या. मात्र, नियमित सफाई होत नसल्याने त्या कचऱ्याने तुडुंब भरल्या आहेत.

रस्ता बांधकामामुळे गावकरी अडचणीत

नवेगावबांध ­: कोहमारा ते नवेगावबांध-वडसा, तसेच सानगडी-नवेगावबांध या राज्य महामार्गाचे काम शिवालया कंपनीद्वारे केले जात आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कडा नसल्याने त्रास होत आहे.