शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या समस्यांत दिवसेंदिवस वाढ

By admin | Updated: August 9, 2015 01:54 IST

बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रिदवाक्य पूर्ण करण्यात एसटीचे आगार अपयशी ठरले आहे.

प्रवासी त्रस्त : एसटीत अस्वच्छता, भंगार गाड्यातून प्रवास सुरूगोंदिया : बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रिदवाक्य पूर्ण करण्यात एसटीचे आगार अपयशी ठरले आहे. ग्रामीण व शहरी भागाची लोकवाहिनी असलेल्या एसटीची गती काळाच्या ओघात मंदावली असून प्रवाशांची दारोमदार खासगी वाहतुकीवरच आहे. त्यामुळे खासगी प्रवाशी वाहतूक फोफावली आहे.प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिद असल्याच्या एसटीची दिवसेंदिवस दुरवस्था कमालीची वाढत आहे. ग्रामीण भागात बसेस वेळेवर सुटत नाही. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत उभे रहावे लागते. परिणामी त्या वेळेवर पोहोचत नाही. गोंदिया व तिरोडा शहरात असे जिल्ह्यात एसटीचे दोन आगार आहेत. दोन्ही आगाराच्या बसेस अन्य जिल्ह्यातही धावतात. येथून ग्रामीण भाग व इतर स्थानकातून एसटी गाड्या सुटतात. मात्र या डेपोच्या अनेक गाड्या भंगार झालेल्या असून त्यांना नवीन गाड्यांची प्रतीक्षा आहे. महामंडळाने एसटीला लोकाभिमुख करण्यासाठी अनेक योजना आणल्या. ग्राहकांना अभिवादन करण्याचीही योजना सुरू केली होती. काही दिवस या योजनेचा गवगवाही करण्यात आला होता. मात्र ही पद्धत कधीचीच औट घटकेची ठरली. एसटीचे उत्पन्न वाढावे म्हणून अनेक योजना सुरू करण्यात आल्या तरी त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे. तसेच एसटीचे वाहक यांच्याकडून प्रवाशांना बऱ्याचदा अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी असून त्यांनाही याबाबत वरिष्ठांकडून सूचना देण्याची गरज आहे. सहकाऱ्यांमध्ये सूचनांनी सुधारणा होत नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.नियमित पासधारकांना एसटीच्या अनियमितपणामुळे त्यांच्या नियोजित वेळेत व ठिकाणी पोहोचता येत नाही. शाळा जेव्हा सुरू असतात त्यावेळीही एसटीमुळे शाळेत जाण्यास उशीर झाला, अशा विद्यार्थ्यांच्या तक्रारी असतात. ग्रामीण भागातील बसफेऱ्या म्हणजे तेथील प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. बसमधील आसनांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. एसटीच्या बसमध्ये धूळ, माती, कागदाचे चिटोरे, प्लॅस्टीक बॅग असतात. काही वेळा उलटीही असते. एसटीच्या स्वच्छतेकडे व्यवस्थापकांचे दुर्लक्ष असल्याच्या तक्रारी प्रवाशी करतात. याकडे लक्ष पुरविणे वरिष्ठ अधिकाऱ्यांना गरजेचे आहे. एसटीला विविध समस्यांचा विळखा पडला आहे. काही वेळा डेपोवरील शौचालय बंद असतात. अधिकचे पैसे तेथे घेतले जातात. या सर्व बाबींचा परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर होत असून खासगी वाहतूकदारांचे चांगलेच फावले आहे. (प्रतिनिधी)