शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

एसटी महामंडळ नफ्यातच

By admin | Updated: January 14, 2016 02:19 IST

सुखाचा व सुरक्षित प्रवास म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेकडे बघितले जाते.

तोट्याचा व्यर्थ कांगावा : गोंदिया आगाराला नऊ महिन्यात सात कोटींचा नफादेवानंद शहारे गोंदियासुखाचा व सुरक्षित प्रवास म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेकडे बघितले जाते. खासगी प्रवासी वाहतुकीपेक्षा एसटी महामंडळाचे तिकीट दर जास्त असतानाही नेहमी महामंडळ तोट्यात चालत असल्याचा कांगावा वरिष्ठ स्तरावर केला जातो. मात्र प्रत्यक्षात एसटी महामंडळ नफ्यातच असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. एकट्या गोंदिया आगाराला गेल्या ९ महिन्यात ७ कोटींचा नफा झाला आहे.रेल्वेचे जाळे लाभलेल्या गोंदिया जिल्ह्यात रस्ता मार्गे प्रवास करणारे प्रवासी कमी असले तरी काही भागात एसटी बसशिवाय दुसरा पर्याय नाही. ‘हात दाखवा, बस थांबवा’ असे ब्रिदच जणू ग्रामीण भागात रूळले आहे. त्यामुळेच एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांमध्ये गोंदिया आगाराला मिळालेल्या उत्पन्नापेक्षा सन २०१५ च्या नऊ महिन्यांत तब्बल २ कोटी ५ लाख ३५ लाख रूपयांचे जास्त उत्पन्न मिळाले आहे. रा.प. महामंडळाच्या गोंदिया आगाराला तिकीटातील सवलतीसह एकूण उत्पन्न २३ कोटी ७२ लाख ५८ हजार रूपये मिळाले. सन २०१४ मध्ये याच कालखंडात गोंदिया आगाराला २१ कोटी ६७ लाख २३ रुपये एवढे उत्पन्न झाले होते. यात तब्बल २ कोटी ५ लाख ३५ हजार रूपयांचा फरक असून एवढे अधिकचे उत्पन्न सन २०१४ च्या तुलनेत सन २०१५ मध्ये झाले आहे.सन २०१५ मध्ये एप्रिल ते डिसेंबरपर्यंतच्या प्रवासासाठी गोंदिया आगाराच्या बसेसमध्ये १४.१० लाख लिटर डिझेल लागले. त्यासाठी ७ कोटी ४३ लाख ७६ हजार रूपयांचा खर्च आला. सन २०१४ मध्ये एप्रिल ते डिसेंबरपर्यंतच्या प्रवासासाठी बसेसमध्ये १३.३३ लाख लिटर डिझेल लागले होता. त्यासाठी ८ कोटी ४७ लाख ६६ हजार रूपयांचा खर्च आला होता. खर्चापेक्षा उत्पन्न अधिकएप्रिल ते डिसेंबर २०१५ या नऊ महिन्यांत गोंदिया आगाराला डिझेल व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनावर एकूण १३ कोटी ९२ लाख ८४ हजार रूपये खर्च आला. या कालखंडात उत्पन्न २३ कोटी ७२ लाख ५८ लाख रूपयांचे झाले. त्यामुळे गोंदिया आगराला या नऊ महिन्यांत खर्चापेक्षा ९ कोटी ७९ लाख ७४ हजार रूपयांचे अधिकचे उत्पन्न झाले. सन २०१४ मध्ये याच काळात गोंदिया आगारात डिझेल व वेतन खर्च मिळून १५ कोटी ६ लाख ९५ हजार रूपयांचा खर्च आला. त्या तुलनेत उत्पन्न २१ कोटी ६७ लाख २३ हजार रूपये झाले होते. हे उत्पन्नसुद्धा ६ कोटी ६० लाख २८ हजार रूपयांनी वाढले आहे. सन २०१४ व २०१५ या दोन्ही वर्षात गोंदिया आगाराला खर्चापेक्षा अधिक उत्पन्न मिळाल्याचे दिसून येते.