शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २१३ विद्यार्थिनींना एसटीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 21:46 IST

शिक्षणासाठी मुलींना मोफत प्रवासाची सुविधा देणाऱ्या ‘अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेची’ व्याप्ती आता वाढविण्यात आली आहे. वर्ग ५ ते १० पर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी असलेल्या या योजनेत आता इयत्ता १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना सुविधा देण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. जिल्ह्यातील २१३ विद्यार्थिनींना या नव्या योजनेमुळे मोफत प्रवासाची सुविधा मिळाली आहे.

ठळक मुद्देअहिल्याबाई होळकर योजना : १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनींचा समावेश

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शिक्षणासाठी मुलींना मोफत प्रवासाची सुविधा देणाऱ्या ‘अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेची’ व्याप्ती आता वाढविण्यात आली आहे. वर्ग ५ ते १० पर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी असलेल्या या योजनेत आता इयत्ता १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना सुविधा देण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. जिल्ह्यातील २१३ विद्यार्थिनींना या नव्या योजनेमुळे मोफत प्रवासाची सुविधा मिळाली आहे.ग्रामीण भागात आजही कित्येक गावांत शिक्षणाची सोय नसल्याने मुलींना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. गावात शाळा किंवा महाविद्यालय नसल्याने परगावी शिक्षणासाठी जाऊ देण्याची परवानगी आजही पालक देत नाहीत. यात कित्येकांना मुलींच्या बाहेरगावी ये-जा करण्याचा खर्च परवडणारा नसतो. अशात मुलींना मन मारून शिक्षण मधातच सोडावे लागते. मात्र ग्रामीण भागातील मुलींनाही शिक्षण घेऊन पुढे जाता यावे. यासाठी ग्रामीण भागातील माध्यमिक शिक्षणाची सोय नसलेल्या ठिकाणापासून सोईच्या ठिकाणापर्यंत मोफत प्रवासाची सुविधा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने करून दिली.यासाठी ‘अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजना’राबविली जात आहे. या योजनेंतर्गत वर्ग ५ ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत प्रवासाची सुविधा होती.१० वी नंतरच्या विद्यार्थिनींना या योजनेतून वगळण्यात आले होते. अशात अशा मुलींचे १० वी नंतरचे शिक्षण धोक्यात येत होते. नेमकी हीच बाब लक्षात घेत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ‘अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजनेची’ व्याप्ती वाढवून १२ वीपर्यंतच्या विद्यार्थिनींना योजनेत समाविष्ट करून घेतले आहे. त्यामुळे आता १२ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींना या योजनेंतर्गत शिक्षणासाठी मोफत प्रवासाची सोय मिळत आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील २१३ विद्यार्थिनींनी आपले पास काढून घेतले असून मोफत प्रवास योजनेचा लाभ घेत आहेत.१० वी पर्यंतच्या २५३६ विद्यार्थिंनीना सवलतअहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजना पूर्वी वर्ग ५ ते १० पर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी होती. या गटातील विद्यार्थिनींची संख्या जास्त असल्याने जिल्ह्यातील २५३६ विद्यार्थिनींनी या योजनेतंर्गत आपले पास काढून घेतल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील २५३६ विद्यार्थिनी या योजनेच्या लाभार्थी असून शिक्षणासाठी योजनेंतर्गत मोफत प्रवासाचा लाभ घेत आहेत.आॅक्टोबर महिन्यात निघाले आदेशयापूर्वी वर्ग ५ ते १० पर्यंत शिकणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी ही योजना राबविली जात होती. मात्र १२ वी पर्यंतच्या कित्येक विद्यार्थिनींना महाविद्यालयात ये-जा करण्यासाठी पैसे मोजावे लागत होते. अशात अशा विद्यार्थिनींना शिक्षणात किमान प्रवासाची तरी सुविधा देता यावी या दृष्टीकोनातून ‘अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजनेत बदल करण्यात आला. यासाठी आॅक्टोबर २०१८ मध्ये तसे आदेश काढण्यात आले आहेत.