लोकमतधर्म-अध्यात्मगोंदिया : श्री जगन्नाथ मंदिर पूजा समितीच्या वतीने स्थानिक श्री जगन्नाथ मंदीर, डब्लींग ग्राऊंड येथून श्री जगन्नाथ यात्रा उत्साहात सुरु झाली. रथयात्रेची सुरुवात जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी श्रीजगन्नाथ मंदिर पूजा समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक बाहेकार सचिव बी.एन. गरनायक, उपाध्यक्ष बी.बी. शाहू, सहसचिव एस.के. मलीक, कोषाध्यक्ष सीताराम अग्रवाल यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते. रथयात्रा ही यात्रा चौक, इंगळे चौक, हनुमान मंदिर, नेहरुचौक, गोरेलाल चौक, गांधी चौक, चांदणी चौक या मार्गाने रथाने मार्गक्रमण केले. रथयात्रा सुरु होण्यापूर्वी श्रीजगन्नाथ मंदीर कमिटीच्या वतीने आरती व पूजा करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व भाविकांना प्रसाद वितरण करण्यात आले. २६ जुलैपर्यंत रोज भजनांचे आयोजन करण्यात आले असून संध्याकाळी महाप्रसाद होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
श्रीजगन्नाथ रथयात्रा उत्साहात सुरु
By admin | Updated: July 23, 2015 01:46 IST