गोंदिया : श्री राष्ट्रीय राजपूत महिला संघटन तसेच महिला व युवा करणी सेनेच्यावतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ३ ते ५ वर्षे व ६ ते १३ वर्षे वयोगटातील मुलांसाठी आयोजित या चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘पाणी वाचवा व पर्यावरण संरक्षण’ या विषयावर आधारित या स्पर्धेचे परीक्षण प्रकाश भैरव, वंदना खतवार, अमितसिंह चव्हाण यांना केले. स्पर्धेत प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व पदक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेसाठी शीलू ठाकूर, करणी सेना महिला जिल्हाध्यक्ष पूजा बैस, इशिता सोलंकी, मीना ठाकूर, बबलू ठाकूर, अमित चव्हाण, अंशुल बडगुजर, राजेंद्र राजकुमार यांनी सहकार्य केले.
चित्रकला स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:49 IST