शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सस्वर मानस गायन स्पर्धेतून आत्मिक आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 22:09 IST

सस्वर मान गायन स्पर्धेतून जीवनात आत्मिक आनंद प्राप्त झाल्याची अनुभूती मानसाला मिळते.

ठळक मुद्देअभिमन्यू काळे : तीन दिवसीय गायन स्पर्धा

आॅनलाईन लोकमतककोडी : सस्वर मान गायन स्पर्धेतून जीवनात आत्मिक आनंद प्राप्त झाल्याची अनुभूती मानसाला मिळते. माणसाला आत्मिक आनंद मिळावा व जीवनात नवीन चेतना निर्माण व्हावी, याकरिता असे धार्मिक कार्यक्रम गरजेचे आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.केशोरी येथील हनुमान मंदिरच्या पटांगणावर तीन दिवसीय सस्वर मानस गायन स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी त्यांच्यासोबत तहसीलदार विजय बारुडे, ठाणेदार नागेश भास्कर, वनपरिक्षेत्राधिकारी काशिकर, कुलदीप लांजेवार, डॉ.आर.एस. काळे, सरपंच रियाज खान, मनेंद्र मोहबंशी, नरेंद्र सांडिल्य, भुवन घाटा, झामसिंग दुधकावरा उपस्थित होते. बजरंग मानस मंच ककोडीचे झामसिंग दुधकावरा यांनी डॉ. अभिमन्यू काळे यांचे शाल, श्रीफळ देवून स्वागत केले.दुष्काळ सदृश्यस्थिती असून सुद्धा असे कार्यक्रम करुन ककोडी गावातील जनतेचे कौतूक केले पाहिजे, असे सांगून ते पुढे म्हणाले, देवरी तालुक्यात २०१७ मध्ये पाऊस कमी असल्यामुळे पिकांची परिस्थिती पाहून मदत करण्यात येईल. २०१७ मध्ये ६८ गावांना मदत जाहीर झाली आहे. ती मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.कृषी पीक विमा फार्म ज्यांनी तांत्रिक अडचणीमुळे भरु शकले नाही त्यांचे फार्मपण ग्राह्य धरले जातील. रोजगार हमी (मनरेगा) १०० दिवस, १५० दिवस काम देण्यात यावे, यासाठी त्यात काही नियमांत बदल करायचे आहे. ते करुन परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे आपल्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी डॉ. अभिमन्यू काळे यांनी सांगितले.याप्रसंगी त्यांनी गावातील लोकांशी चर्चा करून अडचणी जाणून घेतल्या. तसेच त्यांनी तीन दिवसीय गायन स्पर्धेबद्दल आयोजक सदस्यांसोबत चर्चा करुन परिसरातील प्रत्येक गोष्ट जाणून घेतली.