शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणावरील खर्च ही भविष्याची गुंतवणूक - सचिन पायलट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2020 19:09 IST

शिक्षणावर होणार खर्च हा केवळ खर्च नसून ती भविष्यातील गुंतवणूक होय. शिक्षणावर होणा-या खर्चातूनच भावी सुसंस्कृत पिढी आणि उद्याचे भविष्य घडत असते.

गोंदिया : शिक्षण हे असे वरदान आहे जे कधीच कुणी आपल्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. ते नेहमीच आपल्यासोबत असते.दरवर्षी अर्थसंकल्पात ऐवढा खर्च केला जाईल, अशी तरतूद केली जाते. मात्र शिक्षणावर होणार खर्च हा केवळ खर्च नसून ती भविष्यातील गुंतवणूक होय. शिक्षणावर होणा-या खर्चातूनच भावी सुसंस्कृत पिढी आणि उद्याचे भविष्य घडत असते. त्यामुळे शिक्षणावर होणाºया खर्चाला केवळ खर्च म्हणून पाहू नये असे प्रतिपादन राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी येथे केले.गोंदिया शिक्षण संस्थेतर्फे स्व.मनोहरभाई पटेल यांच्या ११४ व्या जयंती कार्यक्रम रविवारी (दि.९) स्थानिक धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या प्रागंणावर आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. प्रफुल्ल पटेल हे होते. या वेळी प्रामुख्याने, महाराष्टÑ विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, महाराष्टÑाचे गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सिने कलावंत सुनील शेट्टी, नगराध्यक्ष अशोक इंगळे, गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा वर्षा पटेल, आ. विनोद अग्रवाल, मनोहर चंद्रिकापूरे, सहषराम कोरोटे, राजू कारेमोरे, प्रकाश गजभिये, माजी खा. मधूकर कुकडे, खुशाल बोपचे, माजी आ.सेवक वाघाये, गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव माजी आ.राजेंद्र जैन प्रामुख्याने उपस्थित होते. सचिन पायलट म्हणाले, स्व. मनोहरभाई पटेल यांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्यात शिक्षणाचे विस्तारलेले जाळे त्यांचे पूत्र खा.प्रफुल्ल पटेल हे तेवढ्याच जबाबदारी पुढे वाढवित आहेत. गोंदिया शिक्षण संस्थेव्दारा संचालित शाळा आणि महाविद्यालय पाहून आपण खरोखरच भारावून गेलो.गोंदिया जिल्ह्यात ऐवढ्या दर्जेदार शिक्षण संस्था असतील याची कल्पनाच आपण केली नव्हती. केवळ शाळा आणि महाविद्यालयाची इमारत चांगली राहून काहीच होत नाही तर संस्थेत कार्यरत कर्मचारी समर्पणाची भावना घेऊन काम करतात त्यावरुन खरी गुणवत्ता दिसून येते. नेमके हेच चित्र येथे आल्यानंतर पाहयला मिळाले. देशात साधन संपत्तीची कमतरता नसून केवळ विकासासाठी इच्छा शक्तीचा अभाव आहे. राजकारणात विचारधारेचा विरोध समजू शकतो मात्र व्यक्तीचा विरोध हे आपण समजू शकत नाही अशी टिका सुध्दा त्यांनी यावेळी केली. सर्वांना सोबत घेऊन विकासाचा रथ पुढे नेऊ -प्रफुल्ल पटेलगोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी पक्ष आणि मनभेद बाजुला ठेऊन विकासाचा रथ पुढे नेऊ.राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार असून पुढील पाच वर्षात निश्चितच शिक्षण, आरोग्य, सिंचन या क्षेत्रात कामे केली जातील. जिल्ह्यात तंत्रशिक्षणाची दर्जेदार सुविधा निर्माण करुन त्यामाध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण सर्वांच्या सहकार्याने निर्माण करु अशी ग्वाही खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिली. मुंगेरीलालचे स्वप्न खरे होणार नाही-अनिल देशमुखमहाराष्टÑात तीन वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. विचारधारा जरी वेगळ्या असल्यातरी राज्याच्या विकासासाठी सर्वांचा दृष्टीकोन मात्र एकसारखाच आहे. मात्र हे विरोधकांना पचत नसल्याने ते हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही असे स्वप्न ते पाहत आहे. मात्र मुंगेरीलालचे हे स्वप्न कधी खरे होणार नाही महाविकास आघाडी सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करेल असा टोला लगावित गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र