शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

३१ मार्चपर्यंत निधी खर्च करा- बागडे

By admin | Updated: March 2, 2016 02:18 IST

शासनाकडून प्राप्त झालेला निधी मार्च २०१६ अखेर खर्च करणे अत्यावश्यक आहे. पण जिल्ह्यात कोणत्याही ग्रामपंचायतीने कामे सुरू केले नाही.

गोंदिया : शासनाकडून प्राप्त झालेला निधी मार्च २०१६ अखेर खर्च करणे अत्यावश्यक आहे. पण जिल्ह्यात कोणत्याही ग्रामपंचायतीने कामे सुरू केले नाही. त्यामुळे सदर निधी परत जाण्याची पाळी आली असून हा निधी वेळेत खर्च करा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) राजेश डी. बागडे यांनी केले. ग्रामविकास मंत्रालयाने चौदाव्या केंद्रीय वित्त आयोगाचे परिपत्रक काढले. त्यात कामे करण्याबाबत सर्व मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. २१ डिसेंबर २०१५ ला निघालेल्या या परिपत्रकानुसार बागडे यांनी हे आवाहन केले. जिल्ह्यातील पूर्ण ग्रामपांयतींचे खाते क्रमांक वित्त विभाग जि.प. गोंदियाला प्राप्त झाले. ७ जानेवारी २०१६ ला वित्त विभागाने २८ कोटी रूपये बँक आॅफ इंडियाला पाठविले. बँक व्यवस्थापक आर.एस. रिगनगावकर यांनी सांगितल्याप्रमाणे खाते क्रमांक बरोबर नसल्यामुळे वेळेवर निधी जमा होऊ शकला नाही. पुन्हा खाते क्रमांक मागवून २५ फेब्रुवारी २०१६ ला जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना निधी त्यांच्या खात्यावर जमा करून दिला. प्रत्येक ग्रामपंचायतींनी कामांचे नियोजन केले. त्या नियोजनाची तालुका समितीकडून मंजुरी घेऊन ग्रामसभेमार्फत मंजूर करून घेतले. कामाच्या मंजुरीप्रमाणे प्रत्येक कामाचे इस्टीमेट तयार करण्यात येत आहेत. परंतु त्या इस्टीमेटवर गटविकास अधिकारी स्वाक्षरीच करीत नाही. उपमुख्य कार्यकारी अधिकारी बागडे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, गटविकास अधिकारी तांत्रिक अधिकारी नसल्यामुळे स्वाक्षरीची आवश्यकता नाही. शाखा अयिभंता व उपमुख्य कार्यकारी अभियंता यांची स्वाक्षरी घेऊन कामे करावी. कोणत्याही परस्थितीत निधी परत जाणार नाही. शासनाने ठरवून दिलेल्या नियोजित वेळेतच निधी खर्च व्हायला पाहीजे. बीडीओ यांना पत्र पाठवून नियोजित तारखेपर्यंत कामे पार पाडण्यास सांगितले असून तसे न झाल्यास सरपंच व सचिव जवाबदार ठरतील, असे त्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)