शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

पेरणीच्या कामाला वेग

By admin | Updated: June 21, 2015 01:09 IST

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार यंदा पावसाची सरासरी कमी राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सालेकसा : हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार यंदा पावसाची सरासरी कमी राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मानसूनचे आगमन झाले असले तरी सुरुवातीपासूनच पावसाचा लहरीपणा दिसून येत आहे. काही ठिकाणी पाऊस अधिक तर काही ठिकाणी कमी दिसत आहे. त्यामुळे पेरणी लवकर करावी की थोडा उशीराने करावी या संभ्रमात अनेक शेतकरी सापडले आहेत. अनेक लोक सावध पवित्रा घेवून पेरणी करीत आहेत. त्यामुळे सालेकसा तालुक्यात आतापर्यंत फक्त १० ते १५ टक्के पेरणी झालेली आहे.मृग नक्षत्राला चार दिवस उरले असले तरी नक्षत्र संपेपर्यंत सालेकसा तालुक्यात २० ते २५ टक्के पेरणी होण्याची शक्यता आहे. त्यात फक्त खार पेरणीचे प्रमाण राहणार आहे. पावसाची अनियमितता पाहून अनेक शेतकरी या वर्षी आवत्या पेरणीच्या विचार करीत आहेत. मात्र या बद्दल आता आवत्या की पेरणी करायची अश्या सं्रमात अनेक शेतकरी आहेत.सालेकसा तालुका हा क्षेत्रफळाच्या दृष्टीकोनातून व लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून एक छोटा तालुका असला तरी या तालुक्याची शेतजमीनीत वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन घेतले जाते. त्यानुसार या तालुक्यात कमी अधिक कालावधीची पीक घेण्यात येत आहे. या तालुक्यातील जमिनीत उर्वरक क्षमता सुद्धा कमी असून पीक उत्पादनाचे प्रमाण कमी असते. विशेष म्हणजे या तालुक्यातील शेतकरी फक्त धानपिक घेण्यावर विश्वास ठेवतो. धानपिकाला जेवढे जास्त पाणी मिळेल तेवढे चांगले मानले जाते. परंतु पाऊस कमी झाला की पीकावर मोठा परिणाम सुद्धा होतो. सालेकसा तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर शेती ही वरथेंबी पावसावर अवलंबून असते. वेळेवर पेरणी करून ही सुरुवातीला पाऊस आला आणि मधात दडी मारली तर पऱ्हे सुकण्याची भिती असते. जर पेरणी उशीरा केली तर रोवणीची वेळ येताना पऱ्हे रोवणी योग्य होत नाही. अशा द्विधास्थितीत वरथेंबी पावसावर अवलंबित शेतकरी असतो याचाच फटका शेतकऱ्यांना बसतो. दुसरे कारण म्हणजे येथे जमिनीत ओलसर पणा जास्त दिवस टिकून राहत नाही आणि पाण्याची वेळोवेळी गरज भाषत असते ही सर्व परिस्थिती बघून शेतकरी पेरणी करित आहेत. (प्रतिनिधी)