शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

निधी उपलब्ध असलेल्या संकुलाच्या कामांना गती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 01:11 IST

येथील पर्यटन संकुल परिसरातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध आहे. मात्र अद्यापही कामाला सुरूवात करण्यात आली नाही. त्यामुळे या कामांना गती देण्याची मागणी नवेगावबांध फाऊंडेशनने जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देनवेगावबांध फाऊंडेशनचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : येथील पर्यटन संकुल परिसरातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध आहे. मात्र अद्यापही कामाला सुरूवात करण्यात आली नाही. त्यामुळे या कामांना गती देण्याची मागणी नवेगावबांध फाऊंडेशनने जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.नवेगावबांध पर्यटन संकुल परिसराच्या विकासाकरीता राज्य शासनाच्या विधी विभागाने प्रादेशिक पर्यटन अंतर्गत ४ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यातून प्र्रवेशद्वारा, इंटरप्रिटीशन सभागृह, अंतर्गत रस्ते, बगीच्याचे नुतनीकरण, पायाभूत सुविधा, नैसर्गिक पायवाट व तसेच इतर कामे प्रस्तावित आहेत. पाटबंधारे विभागाच्या तलावा शेजारी बीच, सभोवताल ग्रील, जेटी पार्इंटवर बैठक व्यवस्था यासाठी १ कोटी रुपये मंजूर आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वनविभागद्वारे हिलटॉप गार्डन व विश्रामगृह बांधकामासाठी १ कोटी २० लाखाचा निधी उपलब्ध आहे. नियोजन विभागाच्या २६ लाख रुपयांचा निधी हिलटॉप गार्डनच्या नुतनीकरणासाठी मंजूर केला आहे. संयुक्त वनव्यवस्थापन समितीकडे एडव्हेंचर स्पोर्ट, नौका विहार, जीपलाईन, रोपवेकरीता ९३ लाखांचा निधी मंजूर आहे. असा एकूण ८ कोटी ३८ लाखाचा निधी मंजूर असूनही एकाही कामाला अद्याप सुरूवात झालेली नाही.पर्यटन संकुलाच्या विकासाकरीता व स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी निधी उपलब्ध असलेल्या कामांना त्वरीत सुरु करण्याचे निर्देश संबंधितांना देण्याची मागणी केली.२० जुलै २०१७ ला पर्यटन संकुलात पालकमंत्री ना. बडोले यांच्या बैठकीत ३ किमीची मिनीट्रेन, थायलंडच्या धर्तीवर प्राणी संग्रहालय आदी काम प्रस्तावीत करण्याचे ठरले होते.या कामांचे प्रस्ताव तयार करुन त्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी या वेळी फाऊंडेशनच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.शिष्टमंडळात फाऊंडेशनचे अध्यक्ष रामदास बोरकर, सचिव विजय डोये, सरपंच अनिरुध्द शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, एकनाथ बोरकर, रितेश जायस्वाल, शितल राऊत, रेशिम काशिवार यांचा समावेश होता. या समस्या लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन बलकवडे यांनी शिष्टमंडळाला दिले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी