शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सट्टा बाजाराला आले उधाण

By admin | Updated: January 7, 2017 01:57 IST

नगर परिषदेची निवडणूक आता अंतीम टप्यात आली असतानाच नगराध्यक्षपदासह प्रभागात असलेल्या दिग्गजांच्या हातजीतवर

उमेदवारांच्या हारजीतवर लागली पैज : तासागणिक बदलतात रेट गोंदिया : नगर परिषदेची निवडणूक आता अंतीम टप्यात आली असतानाच नगराध्यक्षपदासह प्रभागात असलेल्या दिग्गजांच्या हातजीतवर आता पैज लागण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे शहरात आता सट्टाबाजाराला उधाण आले आहे. यामुळे सट्टाबाजारातील उमेदवारांचे रेट बघून निवडणुकीतील चुरस अधिकच वाढू लागली आहे. नगर परिषदेसाठी ४२ सदस्य व नगराध्यक्षपदासाठी थेट निवडणूक येत्या ८ तारखेला होत आहे. या निवडणुकीला आता काही तासांचा अवधी शिल्लक राहीला असून सर्वांच्या नजरा आता निवडणुकीक डेच लागलेल्या आहेत. त्यामुळे सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त निवडणुकांच्याच चर्चा शहरातील कानाकोपऱ्यात रंगल्या आहेत. निवडणुकीत कोण बाजी मारणार यालाच घेऊन सर्वच आपापली गणिते लावत आहेत. त्यात तासातासात नवनवे समिकरण व काल्पनीक निकाल पुढे येत आहेत. रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना घेऊन सर्वांचेच आपापले मत असल्याने कोण पुढे राहील व कोण बाजी मारेल हे त्यांचे तेच ठरवीत आहेत. अशात मात्र सध्या सर्वाधीक चर्चेचा विषय ठरत आहे तो शहरातील प्रथम नागरिकाच्या निवडीचा. शहरातील हा दुसरा प्रयोग असून यापूर्वीही नगराध्यक्षपदाची थेट निवडणूक झाली आहे. त्यामुळे यंदा कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून शहरवासीयांची उत्सुकता वाढली आहे. नेमके याच रणधुमाळीवरून आता निवडणुकीच्या अंतिम टप्यात सट्टाबाजाराला उधाण आले आहे. सट्ट्याची जाण असणारे तसेच काहींकडून फक्त शौक म्हणून आता रिंगणातील उमेदवारांवर रेट लावले जात आहेत. यात प्रामुख्याने नगराध्यक्षपदासाठी रिंगणात असलेल्या व त्यातही फाईट मध्ये असलेल्या काही निवडक उमेदवारांच्या नावावर हा सट्टाबाजार जोर धरत आहे. यामध्ये दर तासागणीक रेट बदलत चालले असून यातूनच किती जणांचे यात इंटरेस्ट आहे याची कल्पना करता येते. तर प्रभागातूनही रिंगणात असलेल्या काही दिग्गजांच्या नावावरही सट्टा लावला जात असल्याची माहिती आहे. यात आता कुणाच्या हाती लक्ष्मी लागते तर कुणाचे खिसे खाली होतात हे तर निकालावरच अवलंबून आहे. प्रचाराला शनिवारच्या रात्रीची मुदत येत्या रविवारी होत असलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आता काहीच तास शिल्लक आहेत. त्यामुळे प्रचाराला अधिकच जोर आला आहे. ात प्रचार वाहनांच गर्दी असतानाच शेवटचा फेर म्हणून उमेदवारही आपापल्या समर्थकांसह मतदारांच्या दारी पोहचत आहेत. अशात निवडणुकीच्या प्रचाराला शनिवारच्या रात्री १० वाजतापर्यंतची मुदत असल्याने उरलेल्या कालावधीत प्रचार सभा व अन्य मार्गांनी प्रचार केले जात आहेत. त्यानंतर मात्र शुकशुकाट होणार आहे.