शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया-संतरागाछी दरम्यान स्पेशल ट्रेन

By admin | Updated: July 21, 2016 01:11 IST

प्रवाशांची अत्यधिक ये-जा व सुट्ट्या लक्षात घेवून दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेद्वारे विशेष ट्रेन (०८०४३) संतरागाछी-गोंदिया..

 गोंदिया : प्रवाशांची अत्यधिक ये-जा व सुट्ट्या लक्षात घेवून दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेद्वारे विशेष ट्रेन (०८०४३) संतरागाछी-गोंदिया स्पेशल ३ आॅक्टोबर ते २८ नोव्हेंबरपर्यंत चालविण्यात येणार आहे. ही गाडी संतरागाछीवरून दर सोमवारी दुपारी २.५० वाजता सुटेल तर मंगळवारी सकाळी ६.०५ वाजता गोंदियात पोहोचेल. तसेच ट्रेन (०८०४४) गोंदिया-संतरागाछी स्पेशल ४ आॅक्टोबर ते २९ आॅक्टोबर २०१६ पर्यंत गोंदियावरून दर मंगळवारी १२.४० वाजता सुटेल व बुधवारी सकाळी ६.१० वाजता संतरागाछी पोहोचेल. या गाडीत एकूण १८ कोच राहतील. यात १० तृतीय श्रेणी वाताणुकूलीत, सहा द्वितीय श्रेणी वाताणुकूलीत व दोन एसएलआर कोच राहतील. ही ट्रेन खडकपूर, चक्रधरपूर, राऊरकेला, झारसुकडा, बिलासपूर, रायपूर, दुर्ग व राजनांदगाव स्थानकांवर थांबेल. तसेच संतरागाछी ते पुणेच्या दरम्यानसुद्धा ८ आॅक्टोबर ते २६ नोव्हेंबर २०१६ पर्यंत स्पेशल ट्रेन चालविण्यात येणार आहे. ट्रेन (०२८२२) संतरागाछीवरून दर शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता सुटेल व सोमवारी पहाटे २.४५ वाजता पुणे येथे पोहोचेल. तसेच ट्रेन (०२८२१) पुणे-संतरागाछी स्पेशल १० आॅक्टोबर ते २८ नोव्हेंबरपर्यंत पुणेवरून प्रत्येक सोमवारी सकाळी १०.३० वाजता सुटेल व मंगळवारी सायंकाळी ६.१५ वाजता संतरागाछी येथे पोहोचेल. गाडीचा (०२८२२) नागपूर येथे आगमन/प्रस्थान ११.१५/११.२५ वाजता (रविवार) तथा गाडीचा (०२८२१) नागपूर येथे आगमन/प्रस्थान १.२०/१.३० वाजता (मंगळवार) राहील. या गाडीत एकूण १३ कोच राहतील. यात आठ तृतीय श्रेणी वाताणुकूलित, तीन द्वितीय श्रेणी वाताणुकूलित व दोन एसएलआर कोचचा समावेश राहणार आहे. ही गाडी खडकपूर, चक्रधरपूर, राहुरकेला, झारसुकडा, बिलासपूर, रायपूर, दुर्ग, राजनांदगाव, गोंदिया, नागपूर, भुसावळ व सूरत आदी स्थानकावर थांबेल, अशी माहिती दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)