शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकांवर ‘विशेष स्वच्छता अभियान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 20:42 IST

भारतीय रेल्वेच्या सर्व स्थानकांच्या संपूर्ण साफसफाईसाठी रेल्वे बोर्डाद्वारे एका महिन्याचा ‘स्वच्छ रेल्वे-स्वच्छ भारत’ विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान २४ मे ते २५ जूनपर्यंत राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देस्वच्छ रेल्वे-स्वच्छ भारत : महिनाभर चालणार साफसफाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भारतीय रेल्वेच्या सर्व स्थानकांच्या संपूर्ण साफसफाईसाठी रेल्वे बोर्डाद्वारे एका महिन्याचा ‘स्वच्छ रेल्वे-स्वच्छ भारत’ विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान २४ मे ते २५ जूनपर्यंत राबविण्यात येणार आहे.या विशेष स्वच्छता अभियानाद्वारे दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या तिन्ही मंडळांच्या सर्व स्थानके, स्थानक परिसर, प्लॅटफार्म व स्थानकात असलेल्या सर्व कार्यालयांची संपूर्ण स्वच्छता करण्यात येत आहे. तसेच रेल्वेगाड्यांमध्येही विशेष स्वच्छता अभियान राबवून साफसफाई केली जात आहे.या अभियानात गाड्यांमधील साफसफाईकडे विशेष लक्ष दिले जात आहे. तसेच गाड्यांच्या आत काही वेळेच्या अंतरात गाड्यांना निष्पादन केले जात आहे. विशेष म्हणजे अशा क्षेत्रात सामान्यत: स्वच्छतेची निरंतर गरज असते. त्या ठिकाणी साफसफाई करून प्रवाशांकडून फीडबॅकसुद्धा घेतले जात आहे.सोबतच स्वच्छता अभियानाद्वारे जनजागृतीसाठी पोस्टर, बॅनर, नुक्कड नाटक, डिसप्लेद्वारे रेल्वे प्रवाशांमध्ये जागृती आणली जात आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने संपूर्ण प्लॅटफार्ममध्ये स्वच्छतेबाबत नजर ठेवली जात आहे. त्यामुळे स्थानक परिसरात कोणत्याही ठिकाणी सफाई बाकी राहणार नाही. साफसफाई करून सर्व कचरा नष्ट केला जात आहे.स्थानक व गाड्यांची साफसफाई करण्यासोबतच स्वच्छतेचा लाभ व त्याची आवश्यकता याबाबत जागृती घडवून आणली जात आहे. जर एखादा प्रवासी हेतूपरस्पर कचरा पसरविताना आढळला तर त्याला कर्मचाऱ्यांद्वारे समुपदेशनही केले जात आहे व नंतर दंडसुद्धा आकारले जात आहे.स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी अधिकाऱ्यांद्वारे निरीक्षणही केले जात आहे. स्वच्छतेचा आढावा घेवून येणाऱ्या समस्यांना दूर केले जात आहे. स्वच्छतेत उणिव राहू नये यासाठी सफाई कर्मचारी, पर्यवेक्षकांसह संपर्क बनविण्यात येत आहे. गाड्यांमध्येही निरीक्षक केले जात आहे. तसेच स्वच्छतेबाबत अहवाल तयार करून वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात येत आहे.२४ मे ते २५ जूनर्यंत एका महिन्याच्या स्वच्छता अभियानात रेल्वेचे सर्व स्थानके, स्थानकातील कार्यालये व प्लॅटफार्म, ट्रॅकवर स्वच्छतेबाबत केवळ प्रवाशांमध्येच जागृती घडवून आणली जात नाही तर स्टॉफसुद्धा साफसफाईबाबत जागृत राहून आपापल्या कार्यालयात स्वच्छतेबाबत संपूर्ण लक्ष ठेवत आहेत. तसेच गरज भासल्यास संबंधित कार्यालयाच्या मदतीने स्वच्छता पूर्ण केले जात आहे. या अभियानाला सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे.ज्ञानेश्वरी व समरसता एक्स्प्रेसच्या डब्यांमध्ये संशोधनरेल्वेद्वारे एक्स्प्रेस गाड्यांना वेगवेगळ्या श्रेणींमध्ये ठेवून प्रवाशांसाठी वेळोवेळी अतिरिक्त डब्यांची (कोच) व्यवस्था व कोच प्रकारांमध्ये संशोधन केले जाते. त्याचप्रकारे गाडी (१२१०१/१२१०२) कुर्ला-हावडा-कुर्ला ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस व गाडी (१२१५१/१२१५२) कुर्ला-हावडा-कुर्ला समरसता एक्स्प्रेस गाड्यांच्या कोचमध्ये संशोधन केले जात आहे. गाडी (१२१०१/१२१०२) कुर्ला-हावडा-कुर्ला ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसच्या एसी-२ चे दोन कोच, एसी-३ चे सहा कोच, एसी-१ चा एक डब्बा, स्लीपर सात कोच, सामान्य तीन डब्बे, पेंट्रीकार एक कोच, दोन जनरेटरसह एकूण २२ कोचमध्ये संशोधन केले जात आहे. कुर्ला येथून ८ आॅक्टोबर २०१८ पासून तर हावडा येथून ५ आॅक्टोबर २०१८ पासून संशोधन केले जाणार आहे. तसेच गाडी (१२१५१/१२१५२) कुर्ला-हावडा-कुर्ला समरसता एक्स्प्रेसमध्ये एसी-२ चे दोन कोच, एसी-३ चे सहा कोच, एसी-१ चा एक डब्बा, स्लीपरचे सात डब्बेड, सामान्य तीन कोच, पेंट्रीकार एक कोच, दोन जनरेटरसह एकूण २२ डब्ब्यांमध्ये संशोधन होणार आहे. कुर्ला येथून १ आॅक्टोबर २०१८ पासून व हावडा येथून ३ आॅक्टोबर २०१८ पासून हे संशोधन होणार आहे.