शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

गर्भवती मातांसाठी गावोगावी विशेष सभा

By admin | Updated: February 16, 2017 00:38 IST

डॉ.एपीजे अब्दूल कलाम सकस आहार योजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व गर्भवती मातांच्या कुटुंबातील पुरुषांना

पती व सासऱ्यांची उपस्थिती : सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांचा पुढाकार गोंदिया : डॉ.एपीजे अब्दूल कलाम सकस आहार योजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व गर्भवती मातांच्या कुटुंबातील पुरुषांना म्हणजेच पती व सासरे यांना गर्भवती मातेच्या आरोग्याबाबत जागरु क करण्यात येत आहे. त्यासाठी महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी (दि.२४) गावोगावी विशेष सभांचे आयोजन केले जाणार आहे. जिल्ह्यातील गर्भवती मातांच्या आरोग्याची योग्य काळजी घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शुन्य मृत्यू अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत गर्भवती स्त्रीयांच्या आहाराकडे काही ठराविक गावांमध्ये डॉ.एपीजे अब्दूल कलाम सकस आहार योजना राबवून गर्भवती मातांना योग्य तो आहार दिला जात आहे. इतर गावांमध्ये गर्भवती माता घेत असलेल्या आहारावर आंगणवाडी सेविका, अधिपरिचारीका यांच्यामार्फत नियंत्रण ठेवले जात आहे. त्यांच्या नियमीत आरोग्याच्या तपासणीचा कार्यक्रम ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत व शहरी भागात जिल्हा शल्य चिकित्सकामार्फत तयार करण्यात आला आहे. ग्रामीण भागात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शाम निमगडे यांच्या तर शहरी भागात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर यांच्या नेतृत्वात करण्यात येत आहे. मातेचे दरमहा हिमोग्लोबीन व रक्त तपासणी करून त्याची माहिती त्या कुटुंबातील सदस्यांना देण्याची योजना आहे. या महिन्यातील पुरु ष सदस्यांची सभा दि.२४ ला घेण्यात येणार आहे. या सभेचे स्थळ आणि वेळ प्रत्येक गावनिहाय ठरविण्याचे नियोजन जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी करणार आहे. गोंदिया व तिरोडा नगरपालिका यासह जिल्ह्यातील सर्व नगरपंचायतीमध्ये गर्भवती महिलांच्या कुटुंबातील पुरु ष सदस्यांच्या सभा घेण्याचे नियोजन जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली बाई गंगाबाई शासकीय स्त्री रु ग्णालय, तिरोडा उपजिल्हा रु ग्णालय आणि जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक करणार आहे. जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते तसेच राजकीय कार्यकर्त्यांचाही यात सहभाग राहणार आहे. त्यांनी गावातील किंवा वॉर्डातील गर्भवती महिलांच्या घरातील पुरु ष सदस्य सभेला राहतील यासाठी प्रयत्न करावे व गर्भवती महिलांच्या आरोग्याविषयी चर्चा करावी असे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले आहे.(जिल्हा प्रतिनिधी)