शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय जात वैधता समितीकडून बोळवण

By admin | Updated: July 26, 2014 02:19 IST

अभियांत्रिकी, वैद्यकीय शाखेसारख्या महत्वाच्या अभ्यासक्रमांना प्रवेश

जीव टांगणीला : विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडलेसोनपुरी : अभियांत्रिकी, वैद्यकीय शाखेसारख्या महत्वाच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र गरजेचे आहे. परंतू विभागीय जात वैधता पडताळणी समितीच्या अडेलटट्टूपणामुळे हजारो विद्यार्थ्यांची बोळवण केली जात आहे. तब्बल एक वर्षापासून त्यांना हे वैधता प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे प्रवेश अडून पडले आहेत.प्राप्त माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यात अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठीचे फॉर्म भरुन ते विभागीय जात वैधता प्रमाणपत्र समितीकडे नागपूरला पाठविले जाते. परंतू वर्ष लोटले तरी प्रमाणपत्र मिळाले नाही. संबधित महाविद्यालयाचे क्लर्क याबाबतची माहिती घेण्यासाठी विभागीय जात वैधता पडताळणी समितीच्या नागपूर येथील कार्यालयात गेले असता त्यांना तुमचे जात प्रमाणपत्र बरोबर नाही असे सांगत ते फॉर्म परत करण्यात आले. त्या फॉर्मसोबत जोडलेले विद्यार्थ्याचे प्रमाणपत्र बरोबर नाही. जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमीलिअर प्रमाणपत्र सोबत नसावे, असे सांगून ते फॉर्म परत देण्यात आले.वास्तविक तहसील कार्यालयमार्फत उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून मिळणारे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमीलीयर प्रमाणपत्र सोबतच दिले जातात. आजपर्यंत जितके जात वैधता प्रमाणपत्र मिळाले आहे, ते या प्रमाणपत्राच्या आधारेच मिळाले आहे. वास्तविक जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेयर सोबतच बनविले जातात. असे असताना आताच विभागीय समितीच्या अधिकाऱ्यांनी हा नवीन नियम कसा काय लावला? असा प्रश्न तमाम विद्यार्थ्यांसह महाविद्यालयांना पडला आहे.महाविद्यालयाचे प्रतिनिधी किंवा स्वत: विद्यार्थी जेव्हा विभागीय जात वैधता प्रमाणपत्रासाठी नागपूरला जातात तेव्हाच त्यांना अर्जातील त्रुटीपत्र व टिपणी लिहून दिली जाते. त्यामुळे त्यांना आल्या पावली मनस्ताप सहन करीत परत यावे लागत आहे.या प्रकाराने हजारो विद्यार्थ्यांचे पुढील अभ्यासक्रमाचे प्रवेश रखडले आहेत. त्याच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत नेमके काय नियम आहेत हे स्पष्ट करून रखडलेली जात वैधता प्रमाणपत्राची प्रक्रिया सुरळीत सुरू करावी अशी मागणी केली जात आहे. (वार्ताहर)