शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणामुळे चिमण्यांना धोका

By admin | Updated: May 27, 2017 00:53 IST

धुळीपासून चक्क परमाणू लहरी आणि कीटकनाशकांच्या प्रदूषणामुळे पशुपक्ष्यांवरसुध्दा विपरीत परिणाम होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : धुळीपासून चक्क परमाणू लहरी आणि कीटकनाशकांच्या प्रदूषणामुळे पशुपक्ष्यांवरसुध्दा विपरीत परिणाम होत आहे. पूर्वी पहाटेपासून तर सायंकाळपर्यंत सतत चालणारा चिमण्यांचा चिवचिवाट कायमचा बंद झाला. शहरातील सिमेंटच्या जंगलामुळे पक्ष्यांचे निवारेसुध्दा लोप पावले. परंतु चिमण्यापाखरांसोबत नातीगोती जपणाऱ्यांनी मात्र चिमण्यांचा सहवास मिळावा म्हणून पक्षीप्रेमी नागरिक घरांच्या गच्चीवर कृत्रिम घरटे लावण्याचा उपक्रम राबवतात. पशुपक्षी घरट्यातून बाहेर येत एकच कलरव होत होता. तेव्हा पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे महिला मंडळी पहाटे सडा सारवण करीत होत्या. परंतु आता सूर्यवशींचा जमाना आला. कुणालाही सडा सारवण करण्याची गरज वाटत नाही. जुन्या काळची भूपाळीसुध्दा काळाच्या पडद्याआड गेली आहे. विज्ञानाने सर्वच क्षेत्रात प्रगती करून मानवाला ऐहिक सुखाच्या विळख्यात टाकले आहे. परंतु तेवढेच दुष्परिणामसुध्दा वाढले आहेत. मानवी जीवन आजाराने वेढले गेले. विकासाची प्रगती मानवी जीवनाला अडसर ठरत आहे. यामुळे मानवाला अनेक आजारांनी ग्रासले आहे. निसर्गातील पशुपक्षीसुध्दा काळाच्या पडद्याआड जात आहे. जंगलात पिकावर होत असलेल्या अतिविषारी कीटकनाशकाच्या फवारणीमुळे पक्ष्यांचे खाद्य अळ्यासुध्दा नाहिशा झाल्याने पशुपक्ष्यावर उपासमारी येऊ लागली आहे. ग्रामीण भागात असणाऱ्या चिमण्या तर केवळ बोटावर मोजण्याइतक्या दिसून येतात. "कावळ्यांचे घर शेणाचे आणि चिमणीचे घर मेणाचे" ही म्हणसुध्दा कालबाह्य झाली आहे. शहरी भागात सिमेंट रस्ते आणि मोठमोठ्या इमारतीमुळे शहरातील चिमण्यांचा चिवचिवाट नाहिसा झाला. पहाट कधी होते हे कळायला मार्ग नाही. कालांतराने येणाऱ्या पिढीला केवळ पुस्तकात चिमण्यांचे चित्र पाहून समाधान मानावे लागेल. पर्यावरणवाद्यांनी यावर चिंतन करण्याची वेळ आली तर शासनाने याकरिता विशेष कायदा करणे गरजेचे झाले. भ्रमणध्वनीसुध्दा याला कारणीभूत ठरत असल्याचे पर्यावरणवाद्यांचे मत आहे. शहरातून तर चिमण्यांचा चिवचिवाट कायमचा बंद झाल्याने निसर्गवाद्यांना सतत चिंता भेडसावू लागली आहे. पक्षीप्रेमी, निसर्गप्रेमी घराच्या आजूबाजूला कृत्रिम घरटे आणि पाण्याची व्यवस्था करून चिमण्या पाखरांना निवारा देण्याचा प्रयत्न करीत असतात.