शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या पावसामुळे पेरण्या खोळंबल्या

By admin | Updated: June 24, 2015 02:01 IST

पावसाळ्याची सुरूवात काहिसा उशीरा झाली. मात्र सतत होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या धानाच्या पेरण्यासह सर्व पेरण्या रखडल्या आहेत.

काचेवानी : पावसाळ्याची सुरूवात काहिसा उशीरा झाली. मात्र सतत होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या धानाच्या पेरण्यासह सर्व पेरण्या रखडल्या आहेत. त्याच बरोबर सर्वच शेतीची कामे जसेच्या तसे पडून आहेत. पावसाळ्याची सुरूवात रोहिनी नक्षत्रापासून होते. मात्र पाण्याची शक्यता नाममात्र असते. मृग नक्षत्रात पेरण्यायोग्य पाऊस येतो, अशी शेतकऱ्यांची समज आहे. या नक्षत्रात पेरण्या पूर्ण केल्यास पेरण्या यशस्वी होतात, असा सर्वसामान्यांचा विश्वास असतो. परंतु गेल्या दशकापूर्वीची आणि आताची समस्या पाहता हे आकलन नाहिसे झाल्याचे दिसून येत आहे. यावर्षी पावसाने काही दिवस उशिरा हजेरी लावली. मात्र पावसाने शेतकऱ्यांना मोकळीकता दिली नसल्याने पेरण्याची कामे अपवाद वगळता जसेच्या तसेच पडून आहेत. ज्यांच्या शेतात कृत्रिम पाण्याचे साधन आहेत, त्यांनी पाऊस येण्याच्या पूर्वी पेरण्या पूर्ण केल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांची शेती नैसर्गिक पाण्यावर आधारित आहेत, त्यांच्या पूर्ण पेरण्या आताही होण्यास आहेत. काही शेतकऱ्यांनी पंपाच्या सहाय्याने पेरण्या केल्या. त्या पेरण्यासुध्दा पावसाच्या पाण्यामुळे सडण्याच्या मार्गावर आहेत. पेरण्याच्या वेळी पावसाची पंधरा दिवस मोकळीकता असायला हवी. तेव्हाच पेरणी पूर्व मशागत व पेरणीनंतर मशागतीची कामे पूर्ण केली जातात. ही सर्व शेतकऱ्यांची कामे पडून आहेत. याशिवाय अन्य पेरण्यांमध्ये तुरीच्या पेरण्या, तिळाच्या पेरण्या तसेच इतर पेरण्या रखडल्या आहेत. तुळीचे पीक लावणे आता कठीण झाले आहे. सध्या पेरण्याचे कार्य वीस दिवस उशिरा झाले आहे. येत्या पंधरा दिवसात पेरण्या करण्यात आल्या नाही तर शेतकरी पुन्हा संकटात सापडणार व शेतकऱ्यांना चिखलातील पेरण्या कराव्या लागतील. मात्र चिखलातील पेरण्या केल्याने धान खराब होण्याची शक्यता असते. (वार्ताहर)