कृषी पर्यवेक्षक : शेतकरी कार्यशाळेत मार्गदर्शनगोरेगाव : धान उत्पादनात वाढ करण्यासाठी बीज प्रक्रिया करून धान बियाण्यांची पेरणी करावी, असे मार्गदर्शन कृषी पर्यवेक्षक शहा यांनी केले. शहारवाणी येथे गुरूवारी (दि.४) शेतकरी कार्यशाळा पार पडली. या वेळी ते बोलत होते.याप्रसंगी आर.के. हरिणखेडे, एच.बी. टेंभरे, विनोद गौतम, सोमेश्वरी पटले, रजनी पटले, विनोद पटले, सुरेश नेवारे प्रामुख्याने उपस्थित होते.ते पुढे म्हणाले की, या परिसरात २० हेक्टर शेतजमिनीत धान उत्पादन होते. एका हेक्टरात २८ क्विंटल धान होतात. खर्च हा २५ हजार व उत्पादन ३७ हजार रूपये आहे. पीक चार महिन्याचे आहे, त्यामुळे कीड रोगापासून संरक्षण करण्यासाठी बीज प्रक्रिया आवश्यक आहे. सिंचनाची व्यवस्था व कीड रोगावर नियंत्रण केल्यास ३० टक्के उत्पन्न वाढू शकते. बीज प्रक्रियेसाठी १० लिटर पाण्यात ३०० ग्राम मीठ टाकून द्रावण करावे. त्यात बियाणे टाकून पाण्यावर तरंगणारे पोचट रोगट बियाणे टोपलीने काढावे. बुडाशी बसलेले धान काढून स्वच्छ पाण्यात धुवून सावलीत वाळवावे. त्यांना प्रती किलो तीन गधमाम थासरम लावून परेणी केल्यास बुरशीजन्य रोग, पानावरील करपा, देटावरील करपा, दाण्यावरील करपा, कडाकरपा यापासून संरक्षण मिळेल. हवेद्वारे पसरणाऱ्या रोगासाठी बुरशीजन्य औषधी वापरावी. ७५ टक्के शेतकरी घरच्या धानबियाण्यांचा वापर करीत आहेत. त्यामुळे बीजप्रक्रिया करणे गरजेचे आहे. आपण बीजप्रक्रिया करा व उत्पादनात वाढ करा, असे आवाहन करून बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविले.संचालन कृषी सहायक आर.के. हरिणखेडे यांनी केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने परिसरातील शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
बीजप्रक्रिया करून धान बियाण्यांची पेरणी करा
By admin | Updated: June 8, 2015 01:33 IST