शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

ढोल व शहनाईचा आवाज समाजाला प्रेरित करतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 23:39 IST

आदिवासी नगारची समाज गरीबीमुळे विकासापासून कोसोदूर आहे. आदिवासी नगारची समाजाचे ढोल व शहनाई हे पारंपारिक वाद्य आहेत. सण-उत्सवात ढोल-शहनाईचा आवाज संपूर्ण समाजाला प्रेरित करीत असतो.

ठळक मुद्देलखनसिंह कटरे : आदिवासी नगारची समाजाचे संस्कृती महासंमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आदिवासी नगारची समाज गरीबीमुळे विकासापासून कोसोदूर आहे. आदिवासी नगारची समाजाचे ढोल व शहनाई हे पारंपारिक वाद्य आहेत. सण-उत्सवात ढोल-शहनाईचा आवाज संपूर्ण समाजाला प्रेरित करीत असतो. अनेक सण-उत्सवांमधून या वाद्यांचा वापर केला जातो. सद्या डीजेच्या युगातही या ढोल-शहनाईलाच्या वाद्याला समाजात मान्यता आहे. हे वाद्य टिकविण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य लखनसिंह कटरे यांनी केले.अखिल भारतीय आदिवासी नगारची समाज विकास समितीतर्फे गोंदियाच्या नारायण लॉन येथे आदिवासी नगारची संस्कृती महासंमेलन बुधवार (दि.२०) आयोजित करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक जि. प.अध्यक्ष सीमा मडावी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी शिवप्रसाद बरले होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष रूकेश नागरची, रोशन सावंतवान, विनय नागरेराजेंद्र मरस्कोल्हे, मधुकर उईके, राजकुमार हिवारे,विजय राठीपीटाने, भूवन बुरले, रूकेश नगारची, रोशन पडवार, विनय नागरे, राजू मिरचुले, कुंजीलाल कुमरे, बसंत सिंहमारे, सुधाकर नगारची, वनवास हिवारे, घनश्याम नगारची, विजय राठीपीटने, रामभरोश अकलगुनिया उपस्थित होते. महाराष्टÑ, छत्तीसगड व मध्यप्रदेश या तीन राज्यातील समाजबांधव या मेळाव्याच्या निमीत्ताने एकत्र आले होते. या संमेलनात आदिवासी नगारची समाजाची संस्कृती समाजातील तरूणांच्या नृत्यातून दाखविण्यात आली. नगारची समाजाचे ढोल, शहनाई हे वाद्य वाजवण्यात आले. पुराडा व चिखली येथील तरूण-तरूणींनी आदिवासी वेषभूषेत नृत्य सादर केले.उदघाटक जि.प. अध्यक्ष सीमा मडावी यांनी आदिवासी समाजाचे पारंपारीक वाद्य नागरा वाजवून संमेलनाचे उद्घाटन केले.या वेळी जि.प. अध्यक्ष सीमा मडावी व राष्ट्रीय बिरसा ब्रिगेडचे संघटक सतीश पेंदाम यांनीही मार्गदशन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डायटचे प्राचार्य राजकुमार हिवारे यांनी केले. त्यांनी आदिवासी नगराची समाजातीच दशा, दिशा यावर माहिती दिली. संचालन राजेश सोरले तर आभार संजीव कुंमरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी मधुकर उईके, विजय राठीपीटने, दिनेश तांडे, भूपेंद्र बुरले, वनवास हिवारे, राजू मिरचुले, कुंजीलाल कुंमरे, बसंत सिंहमारे, सुधाकर नगारची, घनश्याम नागरची, रामभरोष अकलगुनिया, रोशन सावतवान, मिथून राठी यांनी सहकार्य केले.या समाजबांधवांचा सत्कारया वेळी नगारची समाजातील जेष्ठ समाजसेवकांचा समाजभूषण म्हणून सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते. स्व.उमेदलाल सोरले, राठीपीठणे, योगेश सोरले, श्रीराम येरके, श्रीराम बेरले, पेंढारी हिवारे, सिंहमारे, गोरेलाल नागरे, अर्जुनीसिंग नागरे, बॅरिस्टर नगारची यांचा सत्कार करण्यात आला.