शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात शेतकऱ्यांनी फुलविली ज्वारीची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील शेतकरी प्रामुख्याने धानाचे पीक घेतो. यामुळे जिल्ह्यात धानाचे उत्पादन जास्त प्रमाणात होत असून जिल्ह्याची ओळख धानाचा जिल्हा म्हणून आहे. खरीप तसेच सिंचनाची सोय असल्यास शेतकरी रबीतही धानाचे पीक घेत असून अन्य पिकांकडे वळण्याची त्यांची मानसिकता दिसून येत नाही. मात्र निसर्गाची साथ नेहमीच मिळणार असे नसल्याने धानात कित्येकदा त्यांना नुकसान सहन करावे लागते. अशात धानासोबतच काही अन्य पीक घेतल्यास शेतकऱ्यांना तेवढाच हातभार लागावा या दृष्टीने कृषी विभागाकडून नवनवे प्रयोग केले जात आहेत. 

ठळक मुद्देकृषी विभागाचा प्रयोग : ज्वारी लागवडीचे यंदाचे दुसरे वर्ष

कपिल केकतलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : धानाचे कोठार असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आता शेतकरी धानाच्या जोडीला ज्वारी घेत आहे. येथील कृषी विभागाने मागील वर्षापासून जिल्ह्यात ज्वारीचा प्रयोग सुरू केला असून यंदाही जिल्ह्यातील आठही तालुक्यात ज्वारीची लागवड करण्यात आली आहे. यामुळे कमी प्रमाणात का असेना आता जिल्ह्यातील शेतकरी ज्वारी लावगवडीकडे वळू लागला असून जिल्ह्यात ज्वारी फुलू लागली आहे.जिल्ह्यातील शेतकरी प्रामुख्याने धानाचे पीक घेतो. यामुळे जिल्ह्यात धानाचे उत्पादन जास्त प्रमाणात होत असून जिल्ह्याची ओळख धानाचा जिल्हा म्हणून आहे. खरीप तसेच सिंचनाची सोय असल्यास शेतकरी रबीतही धानाचे पीक घेत असून अन्य पिकांकडे वळण्याची त्यांची मानसिकता दिसून येत नाही. मात्र निसर्गाची साथ नेहमीच मिळणार असे नसल्याने धानात कित्येकदा त्यांना नुकसान सहन करावे लागते. अशात धानासोबतच काही अन्य पीक घेतल्यास शेतकऱ्यांना तेवढाच हातभार लागावा या दृष्टीने कृषी विभागाकडून नवनवे प्रयोग केले जात आहेत. यातच मागील वर्षापासून जिल्ह्यात कृषी विभागाकडून ज्वारीचा प्रयोग केला जात आहे. यंदाही जिल्ह्यातील आठही तालुक्यात ज्वारीचा प्रयोेग करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, त्यांचा हा प्रयोग जिल्ह्यात यशस्वी होताना दिसत असून ज्वारी चांगलीच फुलू लागली आहे. यामुळे हळूहळू शेतकरी आता ज्वारीच्या लागवड़ीकडे वळणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

आरोग्यासाठी उत्तम व जनावरांना चाराहीज्वारीचा आहारात समावेश आरोग्यदायी असल्याचे सांगितले जाते. यामुळे आता नागरिकांचा कल गव्हापेक्षा ज्वारीकडे वाढू लागला आहे. अशात ज्वारीची मागणी वाढणार यात शंका नाही. विशेष म्हणजे, ज्वारीला गव्हापेक्षा जास्त दर मिळत असून पाणीही कमी लागते. यामुळे ज्वारीचे उत्पादन शेतकऱ्यांना गव्हापेक्षा जास्त परवडणारे ठरणार आहे. त्यातही, ज्वारीचा कडपा उत्कृष्ट कोरडा चारा असल्याने मानवासह जनावरांसाठीही ज्वारीची लागवड फायद्याची ठरणार असल्याचे कृषी अधीक्षक गणेश घोरपडे यांनी सांगितले. यंदा ३७२ हेक्टर क्षेत्रात पेरणीकृषी विभागाकडून मागील वर्षापासून जिल्ह्यात ज्वारी लागवडीचा प्रयोग केला जात आहे. त्यानुसार, यंदाही कृषी अधीक्षक गणेश घोरडे यांनी जिल्ह्यात ज्वारीचा हा प्रयोग सुरू ठेवला आहे. यंदा जिल्ह्यात ३७२ हेक्टर क्षेत्रात रब्बी ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, त्याचे चांगले परिणाम दिसत असून शेतकरीही आता ज्वारी लागवडीकडे वळत असल्याचे दिसत आहे.

 

टॅग्स :agricultureशेती