लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : फुलचूर येथे जलशुध्दीकरण केंद्र नसल्याने या परिसरातील गावकºयांना सार्वजनिक विहिरी, बोअरवेलचे पाणी प्यावे लागत आहे. येथील नागरिकांची ही समस्या लवकरच मार्गी लावण्यात येईल. फुलचूर-फुलचूरपेठ-मुर्री-पिंडेकपार या चार गावांसाठी संयुक्तपणे जलशुद्धीकेंद्र स्थापन करुन शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येईल, असे प्रतिपादन आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले.स्थानिक आमदार विकास निधीतून फुलचूर येथे १५ लाख रुपयांची विविध विकास कामे मंजूर करण्यात आली. या कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी प.स.सभापती स्रेहा गौतम, प.स.उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, जि.प.सदस्य सीमा मडावी, योगराज उपराडे, सरपंच लक्ष्मी कटरे, उपसरपंच आशा मेश्राम, गुनराज ठाकरे, उमेश पंजारे, मुकेश लिल्हारे, महेश अंबुले, देवचंद बिसेन, दुर्गाप्रसाद नागपूरे, सुनीता सव्वालाखे, सत्यभामा कवास, सुशिला नेवारे, मिना देवगडे, मनोहर कटरे, कस्तुर बिसेन, तेजराम भांडारकर, राजेश कटरे, योगराज अंबुले, झिंगर पटले उपस्थित होते.आ.अग्रवाल म्हणाले, परिसरात विकास कामे खेचून आणने हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. विकासासाठी कठिबध्द राहून दिलेला शब्द पाळणे हे देखील कर्तव्य आहे. फुलचूर परिसराच्या विकासासाठी मी सदैव कठिबध्द आहे. या परिसरात विविध विकास कामे करण्याचे आश्वासन अग्रवाल यांनी दिले. गौतम यांनी आ.अग्रवाल यांच्या माध्यमातून या परिसरात विविध विकास कामे करण्यात आली.यापुढेही अनेक विकास कामे करण्यात येणार आहे. त्यांच्यात प्रयत्नांमुळे १ कोटी ८० लाख रुपये खर्चून अतिरिक्त पाणी पुरवठा योजनेमुळे गावकºयांना शुध्द पाणी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. यावेळी फुलचूर येथील रस्ता सिंमेटीकरण, जि.प.शाळा सुरक्षा भिंतीचे बांधकाम, बोअरवेल आदी कामांचे भूमिपूजन अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
लवकरच शुद्ध पाण्याचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 21:27 IST
फुलचूर येथे जलशुध्दीकरण केंद्र नसल्याने या परिसरातील गावकºयांना सार्वजनिक विहिरी, बोअरवेलचे पाणी प्यावे लागत आहे.
लवकरच शुद्ध पाण्याचा पुरवठा
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : फुलचूर येथे विविध कामांचे भूमिपूजन