शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायत निवडणूक घोषित होताच पुढारी ॲक्टिव्ह मोडवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 05:00 IST

नगरपंचायत निवडणुकानंतर जिल्ह्यात नगर परिषद आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत चांगला रिझल्ट दिल्यास त्याचेच पडसाद जिल्हा परिषद निवडणुकीत उमटू शकतात. नगरपंचायत निवडणूक ही अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, गोरेगाव, देवरी या चार शहरांपुरती मर्यादित असली तरी या निवडणुकीवर बरेच राजकारण अवलंबून आहे. त्यामुळे मागील आठ ते दहा दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांचे नेते या चारही शहरांत तळ ठाेकून बसल्याचे चित्र आहे, तर राजकीय पक्षाचे वरिष्ठ नेत्यांचे दौरेसुद्धा वाढले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १०५ नगर पंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम बुधवारी जाहीर केला. यात गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, गोरेगाव, देवरी या चार नगरपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. बुधवारी निवडणूक जाहीर झाल्यानंतर गुरुवारपासून जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षाचे पुढारी ॲक्टिव्ह मोडवर आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नगरपंचायत निवडणुकानंतर जिल्ह्यात नगर परिषद आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत चांगला रिझल्ट दिल्यास त्याचेच पडसाद जिल्हा परिषद निवडणुकीत उमटू शकतात. नगरपंचायत निवडणूक ही अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, गोरेगाव, देवरी या चार शहरांपुरती मर्यादित असली तरी या निवडणुकीवर बरेच राजकारण अवलंबून आहे. त्यामुळे मागील आठ ते दहा दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांचे नेते या चारही शहरांत तळ ठाेकून बसल्याचे चित्र आहे, तर राजकीय पक्षाचे वरिष्ठ नेत्यांचे दौरेसुद्धा वाढले आहेत. सभा, मेळावे आणि बैठकांमधून आपल्या पक्षाचा कोणता उमेदवार तगडा राहू शकतो याचा कानोसा घेतला जात आहे. कोरोनामुळे नगरपंचायतच्या निवडणुका वर्षभर लांबणीवर गेल्या होत्या. त्यातच राज्य निवडणूक आयोगाने नगरपंचायतच्या निवडणुका जाहीर केल्याने गुलाबी थंडीत राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुका जाहीर होताच इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच तिकिटासाठी पक्षाकडे फिल्डिंग लावल्याचे चित्र आहे, तर सर्वच राजकीय पक्षांनी स्थानिक ज्येष्ठ नेते आणि आमदारांवर या निवडणुकीची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे हे सर्वच आता ॲक्टिव्ह मोडवर आल्याचे चित्र आहे. 

एकला चलो रे चा नारा कायम - राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी कायम राहण्याची शक्यता कमीच आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वबळावरच निवडणुका लढविण्यासाठी सज्ज राहण्याचा मंत्र दिला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनासुद्धा एकत्रित निवडणुका लढविण्यास फारसे इच्छुक नसल्याचा सूर स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये एकला चलो रे चा सूर कायम आहे.

स्थानिक नेत्यांचा लागणार कस- स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांचा चांगलाच कस लागणार आहे. सर्वच राजकीय पक्षात आलबेल असल्याचे सांगितले जात असले तरी वास्तविकेत असे काहीच नाही, तर निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्षांमध्ये आऊट गोईंग आणि इनकमिंग जोरात सुरू आहे. पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मनधरणी करताना स्थानिक नेत्यांचा चांगलाच कस लागणार आहे

 

टॅग्स :Electionनिवडणूक