शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता शिथिल होताच विकासकामांना आला ऊत

By admin | Updated: May 13, 2014 23:38 IST

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात लागू असलेली आदर्श आचारसंहिता २५ एप्रिलपासून शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे पेंडिंग पडून असलेल्या विकासकामांना पुन्हा ऊत आल्याचे चित्र बघावयास मिळत आहे

गोंदिया : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात लागू असलेली आदर्श आचारसंहिता २५ एप्रिलपासून शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे पेंडिंग पडून असलेल्या विकासकामांना पुन्हा ऊत आल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. कोठे भूमिपूजन तर कोठे लोकार्पण या कामांत विद्यमान जनप्रतिनिधींचे शेड्यूल व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी ५ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. त्यामुळे नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद सर्वच विभागातील विकासकामांना, बैठकींना बंदी घालण्यात आली होती. राज्यात तीन टप्यांत मतदान घेण्यात आले. त्यानुसार २४ एप्रिल रोजी राज्यातील मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर आचारसंहिता शिथिल होईल, हे अपेक्षित होते. यानुसार २५ एप्रिल रोजी राज्यातील आचारसंहिता शिथिल करण्यात आली. मात्र आता राज्यातील आचारसंहिता शिथिल झाल्याने पुन्हा नेत्यांचे फावले आहे.

त्याचे असे की, लोकसभेच्या निवडणुका तर सरल्या चार महिन्यांनी पुन्हा विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. अशात विद्यमान व भावी आमदार आपली तयारी करण्यास मुक्त झाले आहेत. विद्यमान आमदार आता आपल्या निधीतील विकासकामे सुरू करून क्षेत्रातील मतदारांना इम्प्रेस करू शकणार तर भावी आमदार जनसंपर्क करून आपणही रिंगणात असल्याचे मतदारांना सांगू शकतील. त्यामुळे सर्वत्र नेतेमंडळींची लगबग दिसून येत आहे.

सध्या या नेतेमंडळींना एक मुद्दा चांगला मिळाला आहे. तो म्हणजे धान खरेदी केंद्र सुरू करण्याचा. राज्य शासनाने शासकीय धान खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने शेतकर्‍यांचे हितैशी धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करीत आहेत. तर काही आंदोलनाचा नगाडा पिटत आहेत. शिवाय विद्यमान आमदारांनी पेंडिंग पडून असलेल्या विकास कामांना पुन्हा सुरूवात केली आहे.

भूमिपूजन व लोकार्पण सध्या जोमात सुरू आहेत. शहरातही विकास कामे जोमावर सुरू झाली आहेत. शहरातील कित्येक भागांतील रस्ते दुरूस्ती सुरू झाली आहे. नेहरू चौक, आंबेडकर चौक, मामा चौक, बाजार भाग यासह सुमारे सर्वच भागांत कामे केली जात आहेत. यावरून सध्या विकासकामांना ऊत आल्याचे दिसून येते. मात्र मतदार आता शहाणा झाला आहे. हे सर्व कशासाठी हे त्याला चांगलेच ठाऊक आहे.

(शहर प्रतिनिधी)