शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

सोनपुरीवासीयांचा जनआंदोलनाचा इशारा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:31 IST

गोंदिया : नगर परिषदेने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी घेतलेल्या ग्राम सोनपुरी येथील विवादित जागेवरील घनकचरा प्रकल्पाला गावकऱ्यांनी विरोध केला आहे. ...

गोंदिया : नगर परिषदेने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी घेतलेल्या ग्राम सोनपुरी येथील विवादित जागेवरील घनकचरा प्रकल्पाला गावकऱ्यांनी विरोध केला आहे. एवढेच नव्हे तर कचरा उचलण्यात आला नाही तर जनआंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

शहरातील मोक्षधाम परिसरात मागील कित्येक वर्षांपासून शहरातील घनकचरा टाकला जात आहे. आता त्यात कोरोनामधील कचऱ्याचाही समावेश असून यामुळे मोक्षधाम परिसरात घाण साचली असून दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून आरोग्याच्या दृष्टीने याला विरोध होत आहे. अशात नगर परिषदेने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी येथून समारे १५ किलोमीटर अंतरावरील ग्राम सोनपुरी येथे प्रकल्पासाठी जागा घेतली असून तेथे कचरा टाकला जात आहे. मात्र हा कचरा गावातील नाल्यालगत असून तेथील कचरा नाल्याद्वारे वैनगंगा नदीत जाणार व याला गावकऱ्यांचा विरोध आहे. विशेष म्हणजे, गावातील सरपंचाने ग्रामसभेच्या निर्णयाला विरोध करून ही जागा दिल्याचे गावकरी बोलत आहेत. करिता त्या जागेवर टाकण्यात आलेल्या कचरा त्वरित उचलण्यात यावा अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा नटवरलाल जैतवार, अडकन तुरकर, बसंत ठाकरे, चंद्रपाल पटले, छगन अंबुले, शैलेश वैद्य, ईश्वर चौरागडे, सौरभ बोपचे, विजय कटरे, दुडीकल ठाकरे, राहुल ठाकरे आदींनी दिला आहे.