गोंदिया : शहरातील नागरिकांना महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागातर्गंत शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र सदर योजना ३० ते ४० वर्ष जूनी असून या योजेनची पाईपलाईन जीर्ण झाली आहे. त्यामुळे शहरातील काही भागातील नागरिकांना मागील काही दिवसांपासून दूषीत पाण्याचा पुरवठा होत आहे. नवीन पाईपलाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. शहरातील सिव्हिल लाईन परिसरातील गांधी वॉर्ड तसेच सूर्याटोला, गौतमनगर, छोटा गोंदिया, शास्त्रीवार्ड या परिसरातील काही भागात दूषीत पाण्याचा पुरवठा नेहमीच होत असतो. कधी कधी महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाकडून अनियमित पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाच्या ४० वर्षे जुन्या पाईपलाईन मधून पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र सदर पाईपलाईन ठिकठिकाणाहून लिकेज झाल्यामुळे नालीतील पाणी शिरून सदर दूषीत पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे. शहरात ४९० बोरवेल असून यापैकी बर्याच बोरवेल नादुरस्त आहेत. तर काही बोरवेलचे पाईपदेखील कुजले आहेत. शिवाय सार्वजनिक विहिरीमधील गाळाचा उपसा बर्याच दिवसांपासून करण्यात आला नाही. त्यामुळे अशुध्द पिण्याचे पाणी पुरवून पालिका प्रशासन नागरिकांच्या जिववार उठल्याची प्रतिक्रिया येथील नागरिक व्यक्त करित आहेत. गांधीवार्ड ही वस्ती शहरातील सर्वात जुना भाग आहे. या ठिकाणी महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाच्या नळांद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. याशिवाय हातपंप व सार्वजनिक विहिरी देखील आहेत. मात्र, तिन्ही स्त्रोतांतील पाणीपुरवठा दूषीत असल्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषीत पाणी पुरवठ्यामुळे शहरवासीयांना साथीच्या आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनोहर चौक ते सतीबोळी चौक, मोहन रामटेककर यांचे घर ते जगदेवप्रसाद मिश्रा यांच्या घरापर्यंत असलेल्या महाराष्टÑ जीवन प्राधीकरणाच्या पाईपलाईनला अनेक ठिकाणी लिकेज आहेत. पाईपलाईन सांडपाण्याच्या नाल्यामधून टाकण्यात आली आहे. नालीतील दूषित पाणी पाईपमध्ये जाऊन ते नागरिकांना पिणे भाग पडत आहे. बोरवेल आहेत मात्र त्यांचे पाईपदेखील कुजले आहेत. पाण्याबरोबर गंज येत आहे. तसेच सार्वजनिक विहिरींमधील गाळाचा उपसा गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात आला नाही. तर बोरवेलची कित्येक वर्षापासून दुरूस्ती करण्यात आली नसल्यामुळे बर्याच बोरवेल नादुरूस्त आहेत. त्यामुळे नागरिकांना नळाच्या पाण्यावर अवलंबून राहुन आपली तहान भागवावी लागत आहे. या परिसरातील नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. पाईपलाईनला मोटार जोडून चोरी काही उच्चभू्र आणि स्वत:ला मोठे समजणार्यांनी जीवन प्राधिकरणाच्या नळांना विद्युत मोटार लावून तिसर्या माळ्यापर्यंत पाणी ओढणे सुरू केले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरी असलेल्या नळांना योग्यरीत्या पाण्याचा पुरवठा होत नाही. या प्रकाराकडे पालिका आणि जीवन प्राधिकरण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप वॉर्डातील नागरिकांनी केला आहे. (प्रतिनिधी)
्रकाही भागात दूषित पाणीपुरवठा
By admin | Updated: May 10, 2014 00:19 IST