शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या समस्या मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:22 IST

गोंदिया : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा गोंदियाच्या वतीने शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात मुख्य लेखा व वित्त अधिकारी अश्विन ...

गोंदिया : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा गोंदियाच्या वतीने शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात मुख्य लेखा व वित्त अधिकारी अश्विन वाहाणे यांच्यासोबत शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी भेट घेऊन चर्चा केली. शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील, असे आश्वासन शिष्टमंडळाला मुख्य लेखा व वित्त अधिकारी वाहाणे यांनी दिले.

यावेळी शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्राथमिक शिक्षकांच्या वेतनातून दरमहा जीपीएफ व डीसीपीएसची रक्कम कपात होते. मात्र, त्याचा हिशोब हा नियमितपणे मिळत नाही. सहाव्या व सातव्या वेतन आयोगचे जीपीएफ थकबाकीचे हप्ते यांचा हिशोब मार्च, २०२१ देणे. जीपीएफ थकबाकी हप्त्याची नोंद घेऊन पावत्या देणे, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके निकाली काढणे व एक लाखापर्यंत वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक मंजुरीचे अधिकार खातेप्रमुखांना देणे, सेवानिवृत कर्मचाऱ्यांची प्रकरणे त्वरित मागे लावण्यात यावी आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. या सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्य वित्तलेखा अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार, सरचिटणीस संदीप मेश्राम, संदीप तिडके, मुकेश रहांगडाले, उमेश रहांगडाले, गजानन पाटणकर, जीवन म्हशाखेत्री, तेजराम नंदेश्वर यांचा समावेश होता.