शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
2
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
3
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
4
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
5
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
7
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
8
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
9
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
10
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलांचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
11
What Is Option Trading: किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
12
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
13
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
14
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
15
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
16
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
17
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
18
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
19
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
20
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील

समाजाची व्याख्या समजली तेच समाजकार्य करतात : केळझरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2017 01:02 IST

नाभिक समाजाची व्याख्या तशी सरळ व सोपी आहे. ज्यांना-ज्यांना समाजाची व्याख्या किंवा संघटनेची व्याख्या समजली

सेनजी महाराज जयंती : समाजाला मजबूत करण्याचे आवाहन देवरी-गोंदिया : नाभिक समाजाची व्याख्या तशी सरळ व सोपी आहे. ज्यांना-ज्यांना समाजाची व्याख्या किंवा संघटनेची व्याख्या समजली ते सर्व बंधू-भगिनी समाज कार्य करून समाज संघटना मजबूत करतात. समाजाला वैभव शिखरावर नेण्याचा प्रयत्न करतात. परंतु ज्यांना समजली नाही ते स्वत:च्या मुलांमुलीच्या लग्नापर्यंतची वाट बघतात असे विचार महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रांत अध्यक्ष पुंडलिकराव केळझरकर यांनी व्यक्त केले. ते गोंदिया येथे नाभिक समाज संघटना आणि सलून व्यवसाय संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत श्री सेनजी महाराज यांच्या ७१७ व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय स्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रांत उपाध्यक्ष अशोक चन्ने, सरचिटणीस अरुणराव जमदाळे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, नगर परिषदेचे उपाध्यक्ष शिव शर्मा, नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार प्रतापगडे, उपाध्यक्ष चुळामन लांजेवार, सलून व्यवसाय जिल्हाध्यक्ष वासू भाकरे, सचिव दुलीचंद भाकरे, जिल्हा महिलाध्यक्षा अनिता चन्ने, तालुकाध्यक्ष लता मेंदूरकर, जिल्हा कार्याध्यक्ष पंचफुला प्रतापगडे, आशा प्रतापगडे, कर्मचारी संघटनेच्या निर्मला फुलबांधे, युवाध्यक्ष संजय चन्ने, श्रीवास समाजाचे अध्यक्ष संजय श्रीवास, मारवाडी समाजाचे अध्यक्ष कालोजी वालीया, सेन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेश जांगडे, उत्सव समितीचे अध्यक्ष सुशील उमरे, गोंदिया तालुकाध्यक्ष भूमेश मेश्राम, सडक-अर्जुनी तालुकाध्यक्ष रनधीर मेश्राम आदी उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष राजकुमार प्रतापगडे, संचालन व आभार जिल्हा सचिव सुरेश चन्ने यांनी मानले. यशस्वीतेसाठी सुशील उमरे, प्रदीप लांजेवार, महेश लांजेवार, कैलाश सूर्यवंशी, मनिष उरकुडे, हेमंत कौशल, विक्रम राजुरकर, चुन्नीलाल सूर्यवंशी, दिपक नागपुरे, राधेश्याम लांजेवार, आलोक लांजेवार, विजय चन्ने, चुन्नीलाल मेंदूरकर, विनायक मेश्राम, सोमेश्वर फुलबांधे, आशिष श्रीवास, संजय चौधरी, लोकेश चन्ने, नूतन बारसागडे व इतर समाजबांधवानी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)