शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावरून शिक्षकांची टिंगल

By admin | Updated: July 30, 2015 01:43 IST

गुरू हे ब्रह्म, विष्णू व महेश समान आहेत. गुरू साक्षात परब्रह्म, अशाप्रकारे गुरु ची महती प्राचीन काळापासून विर्णली जात असली, तरी सध्या सोशल मीडियावरून ...

गोंदिया : गुरू हे ब्रह्म, विष्णू व महेश समान आहेत. गुरू साक्षात परब्रह्म, अशाप्रकारे गुरु ची महती प्राचीन काळापासून विर्णली जात असली, तरी सध्या सोशल मीडियावरून विविध प्रकारच्या विनोदांद्वारे शिक्षकांची टिंगल उडविली जात आहे. त्यामुळे शिक्षकांना अकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे.आजच्या मोबाईल युगात याच गुरूजींवर व्हॉट्सअ‍ॅप वरून विनोदाच्या रूपाने निंदानालस्ती होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शिक्षकांना टार्गेट केले जात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या तांत्रिक युगात शिक्षकांची महती कमी तर होत नाही ना, अशी भीती वाटायला लागली आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप वरून होणारी शिक्षकांची निंदानालस्ती थांबवावी व गुरूचा महिमा कायम राखावी, असे आवाहन वयोवृद्ध, सेवानवृत्त शिक्षकांकडून तसेच शिक्षणप्रेमीकडून केले जात आहे. मोबाईलवर व्हाट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. महाविद्यालयीन युवक, प्रवासी, कर्मचारी व सर्वसामान्य जनतेचा व्हॉट्सअ‍ॅप एक आवश्यक घटक बनले आहे. या वॉट्सअ‍ॅपवरून पाठविलेले विनोद हे लवकरच हिट होतात. या विनोदातून कुणाचीही सुटका होत नाही. काही विनोद सर्वसामान्य परिस्थितीवर प्रकाश टाकतात, तर काही समाजाची निंदानालस्ती करणारेही असतात. गेल्या अनेक दिवसांपासून या अ‍ॅपवर शिक्षकांनाच टार्गेट केले जात आहे. त्यांच्यावरच अनेक विनोद पाठविले जात आहे. या विनोदामध्ेय शिक्षक-विद्यार्थी संवाद आणि नंतर शेवटी शिक्षकांची खिल्ली उडविणारा मजकूर असलेले विनोद बघायला मिळत आहे. या विनोदाने क्षणिक आनंद मिळत असला तरी गुरूस्थानी असलेल्या शिक्षकांची उडविली जाणारी खिल्ली चुकीची असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. संस्कारक्षम विद्यार्थी. त्यांना जबाबदार नागरिक घडविण्यासोबतच ज्ञानार्जनाच्या माध्यमातून राष्ट्रविकास साधण्यात शिक्षकांचा फार मोठा हातभार असतो. मात्र वॉट्सअ‍ॅपवरील विनोदांवरून शिक्षकांचा होणारा आदर, मानसन्मान कमी तर होत नाही ना? अशी शंका या विनोदावरून वाटायला लागते. (तालुका प्रतिनिधी)