शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे सामाजिक बांधिलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 00:37 IST

प्रत्येक नागरिकांना कायदयाची माहिती व्हावी, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होवू नये व ते आपल्या न्यायापासून वंचित राहू नये, त्यांना कायदयाचे संरक्षण मिळावे. यासाठी कायदयाची निर्मिती करण्यात आली आहे.

ठळक मुद्देएम.बी. दुधे : कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर, विविध मार्गदर्शकांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्रत्येक नागरिकांना कायदयाची माहिती व्हावी, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होवू नये व ते आपल्या न्यायापासून वंचित राहू नये, त्यांना कायदयाचे संरक्षण मिळावे. यासाठी कायदयाची निर्मिती करण्यात आली आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहचिवण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हे सदैव तत्पर आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव एम.बी.दुधे यांनी केले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,जिल्हा न्यायालय गोंदिया व ग्रामपंचायत कारंजा यांचे संयुक्त वतीने ग्रामपंचायत कारंजा येथे शनिवारी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. अ‍ॅड.आर.जी.रॉय, अ‍ॅड.अर्चना नंदघळे, अ‍ॅड. प्रणिता कुलकर्णी, कारंजा येथील सरपंच धनवंता उपराडे, उपसरपंच महेंद्र शहारे, ग्रामविकास अधिकारी पी.सी. मेश्राम, पं.स.सदस्य योगराज उपराडे, तंटामुक्ती अध्यक्ष मिताराम हरडे, पोलीस पाटील अलका रंगारी उपस्थित होते.‘मृत्यूपत्राचे महत्व’ या विषयावर मार्गदर्शन करतांना अ‍ॅड .रॉय यांनी स्वत:च्या खाजगी मालकीतून कमावलेल्या जमीन, संपत्ती इत्यादी वस्तूवर कुटुंबातील १८ वर्षावरील व्यक्तीचा समान अधिकाराचा वापर आपल्या मृत्यूनंतर कुटुंबातील व्यक्तींना होतो असे सांगितले. ‘तृतीयपंथीयांचे अधिकार’ या विषयावर बोलतांना अ‍ॅड.नंदघळे यांनी सांगितले की, भारतात अंदाजे दोन लाखाच्यावर तृतीयपंथीय आहेत. त्यांना जगण्याचा अधिकार आहे. सामान्य नागरिकांसारखे समान अधिकार भारतीय राज्यघटनेने त्यांनाही दिले आहेत.आपले मुलभूत हक्क प्राप्त करुन घेण्याचा त्यांनाही अधिकार आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. ‘कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण’ या विषयावर बोलतांना अ‍ॅड. कुलकर्णी म्हणाल्या, भारतीय संविधानाच्या कलम १४ अन्वये महिलांना भेदभावापासून मुक्ती, कलम १५ अन्वये स्त्री-पुरु ष समानता आणि कलम २१ अन्वये जिविताचे व स्वातंत्र्याचे संरक्षण व्हावे, हा व्यापक हेतू डोळयासमोर ठेवून महिलांनी कौटुंबिक अत्याचाराला बळी पडू नये. समाजामध्ये कौटुंबिक हिंसाचार घडू नये म्हणून केंद्र शासनाने कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा २००५ व नियम २००६ संपूर्ण भारतात २६ आॅक्टोबर २००६ पासून लागू केला आहे असे त्यांनी सांगितले. संचालन लिखीराम बन्नाटे यांनी केले तर आभार महेंद्र शहारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर.जी.बोरीकर, पी.एन.गजभिये, गुरुदयाल जैतवार व नोकचंद कापसे यांनी सहकार्य केले.