शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३५ टक्के पीक कर्जाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 05:00 IST

खरीप हंगामात पैशाची चणचण भासू नये यासाठी शेतकरी पीक कर्जाची उचल करण्यासाठी बँकेत जात आहे. मात्र राष्ट्रीयकृत बँकांकडून अजूनही शेतकऱ्यांची कागदपत्रांच्या नावावर कोंडी केली जात आहे. त्यामुळे शेतकरी सुध्दा त्रस्त झाला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन असल्याने शेतकऱ्यांचे आधीच कंबरडे मोडले आहे. त्यातच कागदपत्रांच्या नावावर कोंडी केली जात असल्याने शेतकरी त्रस्त असल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणांची खरेदी आणि शेतीच्या मशागतीची कामे करण्यास अडचण जावू नये, यासाठी शेतकऱ्यांना बँकाच्या माध्यमातून पीक कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. मात्र यंदा खरीप हंगामाला सुरूवात झाली तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ ३५.२७ टक्के पीक कर्जाचे वाटप आतापर्यंत करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट कसे पूर्ण होणार याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.जिल्ह्यात यंदा १ लाख ९९ हजार हेक्टरवर खरिपाची लागवड करण्यात येणार आहे. शेतकरी सध्या खरीप हंगामाच्या कामात व्यस्त आहे. मृग नक्षत्राला सुरूवात झाली असून हवामान विभागाने सुध्दा यंदा दमदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकरी सुध्दा जोमाने कामाला लागला आहे.खरीप हंगामात पैशाची चणचण भासू नये यासाठी शेतकरी पीक कर्जाची उचल करण्यासाठी बँकेत जात आहे. मात्र राष्ट्रीयकृत बँकांकडून अजूनही शेतकऱ्यांची कागदपत्रांच्या नावावर कोंडी केली जात आहे. त्यामुळे शेतकरी सुध्दा त्रस्त झाला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन असल्याने शेतकऱ्यांचे आधीच कंबरडे मोडले आहे. त्यातच कागदपत्रांच्या नावावर कोंडी केली जात असल्याने शेतकरी त्रस्त असल्याचे चित्र आहे. नाबार्ड आणि शासनाने यंदा जिल्ह्यातील जिल्हा, राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकांना यंदा खरीप हंगामात २७० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे.यापैकी आत्तापर्यंत जिल्हा बँकेने ७३ कोटी ७० लाख, राष्ट्रीयकृत बँकांनी ८ कोटी ७६ लाख आणि ग्रामीण बँकांनी १ कोटी २७ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले. आत्तापर्यंत एकूण ९५ कोटी २२ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप करण्यात आले असून त्याची टक्केवारी ३५.२७ टक्के आहे.यात सर्वाधिक ५६.९५ टक्के पीक कर्जाचे वाटप हे गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केले आहे. तर राष्ट्रीयकृत बँकांनी केवळ ८.३२ टक्के पीक कर्जाचे वाटप केले असून राष्ट्रीयकृत बँका पीक कर्ज वाटपाबाबत अद्यापही उदासीन असल्याचे चित्र आहे.पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट गाठणे कठीणचजिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, ग्रामीण आणि जिल्हा बँकेला यंदा २७० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र जून महिन्याला सुरूवात झाली असताना सर्व बँकांनी केवळ ३५ टक्के पीक कर्जाचे वाटप केले असल्याने उर्वरित ६५ टक्के उद्दिष्ट बँका पुढील दोन महिन्यात कसे गाठणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे यंदाही पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण होणे कठीण असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज