शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

दारुची तस्करी करणारे वाहन जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 22:37 IST

अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक करीत असलेली इंडिका अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी पकडली.ईटखेडा गावासमोरील वळणावर बुधवारी (दि.१७) रात्री १ वाजतादरम्यान ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, कार सोडून चालक पसार झाला. पोलिसांनी वाहनासह दोन लाख ८० हजार ६०० रूपयांचा माल जप्त केला.

ठळक मुद्दे३४ हजार रूपयांची दारू जप्त : ईटखेडा गावाजवळील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक करीत असलेली इंडिका अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी पकडली.ईटखेडा गावासमोरील वळणावर बुधवारी (दि.१७) रात्री १ वाजतादरम्यान ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, कार सोडून चालक पसार झाला. पोलिसांनी वाहनासह दोन लाख ८० हजार ६०० रूपयांचा माल जप्त केला.लगतच्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असल्याने या दोन्ही जिल्ह्यात गोंदिया जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दारुची तस्करी केली जाते.यासाठी दारुची तस्करी करणारे अर्जुनी मोरगाव मार्गाचा सर्वाधिक वापर करतात. याला प्रकाराला चाप बसावा याकरिता नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक महादेव तोंदले यांनी कंबर कसली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीवरुन नवेगावबांध ते वडसा मार्गावरून देशी दारुची वाहतूक करणारी टाटा इंडिका जाणार असल्याची माहिती तोंदले यांना मिळाली. माहितीच्या आधारे त्यांनी बुधवारी (दि.१७) रात्री १० वाजतापासून ईटखेडा गावाजवळ नाकाबंदी करून पोलीस तैनात केले.नाकाबंदी असताना टाटा इंडिका क्रमांक एमएच ३४-एए ६६३४ आढळली असता पोलिसांनी चालकाला वाहन थांबविण्याचा इशारा दिला.मात्र चालक भरधाव वेगात वाहन घेवून निघाला. मात्र चालकाचे नियंत्रण सुटल्याने इंडिका रस्त्यावरून उतरून शेतात शिरली व चालक पसार झाला.पोलिसांनी वाहनात बघितले असता रॉकेट ब्रांडच्या १४ पेट्या ज्यामध्ये ९० मिमीचे एक हजार ४०० असा ३३ हजार ६०० रूपयांचा माल आढळला आला. याप्रकरणी पोलिसांनी ३३ हजार ६०० रूपयांची दारू व दोन लाख ५० हजार रूपये किंमतीची इंडिका असा एकूण दोन लाख ८० हजार ६०० रूपयांचा माल जप्त केला.अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी कलम ६५ (ई),७७ (अ) मुदाका सहकलम १३२, १७९ मोवाका अन्वये गुन्हा नोंद केला आहे.सदर कारवाई पोलीस निरीक्षक महादेव तोंदले यांच्या मार्गदर्शनात नापोशि निरज ब्राम्हणकर, विजय कोटांगले, पोलीस शिपाई श्रीकांत मेश्राम, घनश्याम मुके यांनी केली.