परसवाडा : तिरोडा तालुक्यातील अर्जुनी-पिपरिया, सावरा, चांदोरी, कवलेवाडा व गोंदिया तालुक्यातील सायटोला, मुरदाडा, महालगाव, देवरी किन्ही, तेढवा, डांगोरली येथील वैनगंगा नदीच्या पात्रातून मोठय़ा प्रमाणात रेती माफीया अवैधरित्या ट्रॅक्टर ट्रॉली, ट्रकमध्ये रेती भरून तस्करी केली जात आहे. मात्र या प्रकाराकडे तिरोड्याचे, गोंदियाचे महसुल विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे. एक प्रकारे रेती चोरीला एटीएम मशीन समजून अधिकारीही प्रोत्साहन देत आहेत. यातून शासनाच्या उलट धोरणामुळे कोट्यवधी रुपयांचे महसूल बुडत आहे. प्राप्त माहितीनुसार यावर्षी काही घाट लिलाव करण्यात आले होते. काही घाट लिलाव न झाल्यामुळे त्या घाटावरून सर्रास रेतीची तस्करी तलाठी तहसीलदार, पोलीस यंत्रणाच्या आशीर्वादाने होत आहे. यात नागपूर, गोंदिया, तिरोडा, भंडारा, तुमसर येथील रेती माफीया मोठय़ा प्रमाणात सक्रिय झाले आहेत. या घाटावरून दररोज दोनशेच्यावर ट्रक ट्राली रेतीचा उपसा केला जात आहे. कवलेवाडा येथील तलाठी जाधव, अर्जुनी, मुरदाडा, घाटकुरोडा-चांदोरी तलाठी, धापेवाडा व प्रत्येक साझा तलाठी यांच्या दुर्लक्षीत धोरणामुळे या रेती चोरीला व विटांच्या तस्करीला ऊत आले आहे. प्रत्येक तलाठी कार्यालय रेती चोरीच्या मार्गावरच मुख्य ठिकाणी आहेत. त्याच मार्गाने रेती वाहतुक, विटा वाहतुक अन्य तस्करी होत असतात. परंतु तलाठी, पोलीस विभाग कारवाई का करीत नाही. अशा प्रश्न नागरिकांना पडला आहे. शासनाने पर्यावरण भू जल सर्वेक्षणच्या माहितीनुसार सर्व घाट बंद केले. असे तहसीलदार तिरोडा यांनी सांगितले. परंतु तिरोडा तालुक्यात रेतीची सर्रास वाहतुक होत आहे. आजही रेतीची तस्करी सुरूच असल्याचे निर्देशास आणून दिले. पण तहसीलदाराची साठगाठ असल्याने व रेतीची मोठी तस्करी होत आहे. तलाठीने एखाद्या मोठय़ा लोकांचे ट्रक पकडले तर तहसीलदार स्वत:च फोन करतो. व सोडण्यास भाग पाडतो. रेती माफीयाच्या मनात कारवाईची कोणतीच भिती नसल्यामुळे त्याचे व्यवहार राजरोसपणे सुरू आहेत. या अवैध वाहतुकीमुळे रेतीघाट रस्त्याचे बारा वाजले आहेत. मध्यप्रदेशातून दररोज २५ ते ३0 ट्रॅक्टर विटाची तस्करी करतात. त्यांच्याकडून तिरोडा पोलीस स्टेशनला ३0 हजार, दवनीवाडा-गंगाझरीला ही वेगळे दिले जात असल्याचे विटा तस्कराकडून बोलले जात आहे. पोलीस कर्मचारी हप्ते वसुलीसाठी गाडी नंबरची चिठ्ठी घेऊन बोदरांनी नाका, चिरेखनी, पालडोंगरी, इंदोरा फाटा, काचेवानी या ठिकाणी उभे असतात. ज्या वाहतुकदाराने पैसे देण्यास उशीरा केल्यास नाहरकत धमकावतात. पोलीस स्टेशनला गाडी लावण्याची धमकी देतात यात पोलिसाचा ही सिंहाचा वाटा आहे. यामुळे वाहतूक शिपाईने अवैध संपतीही जमवली आहे. त्याची सीबीआय चौकशी केल्यास अनेक संपत्तीची प्रकरण समोर येतील याकडे वरिष्ठ ते कनिष्ठ सगळे मावसभाऊ असल्याचे वृत्त आहे. (वार्ताहर)
लिलाव न झालेल्या घाटावरून रेतीची तस्करी
By admin | Updated: June 2, 2014 01:28 IST