शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मांसाहाराला लाजविणाऱ्या भोंबोळीची धूम

By admin | Updated: August 10, 2015 01:23 IST

श्रावणात मांसाहार वर्ज्य असल्याने खवय्यांची चांगलीच कोंडी होते. मात्र त्याला पर्याय ठरणाऱ्या आणि शुद्ध शाकाहारी असलेल्या भोंबोळीने (मशरूम) सध्या गोंदियात धूम केली आहे.

४०० रुपये दर : पौष्टिक जीवनसत्त्वांनी परिपूर्णगोंदिया : श्रावणात मांसाहार वर्ज्य असल्याने खवय्यांची चांगलीच कोंडी होते. मात्र त्याला पर्याय ठरणाऱ्या आणि शुद्ध शाकाहारी असलेल्या भोंबोळीने (मशरूम) सध्या गोंदियात धूम केली आहे. चक्क ४०० रुपये किलो दर असतानाही खवय्यांकडून भोंबोळीची खरेदी केली जात आहे. पौष्टिक तत्त्वांनी भरपूर असणाऱ्या भोंबोळीची त्यामुळेच चांगली मागणी होत आहे.श्रावणात मांसाहार वर्ज्य असतो. परंतु विशिष्ट चव आणि पौष्टिकतेमुळे भोंबोळीची भाजी मांसाहाराला पर्याय असल्याचे खवय्ये मानतात. ही भाजी त्यांच्या जिभेचे चोचले पूर्ण करीत आहे. त्यामुळेच मांसाहारापेक्षाही अधिक भावात या भोंबोळीची हातोहात विक्री होत असल्याचे येथे दिसून येत आहे. सध्या ४०० रूपये प्रतिकिलो दराने भोंबोळीची विक्री होत आहे. एवढी महाग असतानाही या वनस्पतीजन्य भाजीचे चाहते मात्र खुल्या दिलाने ती खरेदी करून पार्टी करीत आहेत. आकाशात विजा कडाडल्या की, शेतशिवार व जंगलात भोंबोळी उगवते अशी ग्रामीण भागातील लोकांची मान्यता आहे. पांढऱ्या रंगाच्या शेंगासारख्या या भोंबोळीत अत्यंत पौष्टिक तत्व असल्याचे म्हटले जाते. गोंदियात महादेव मंदिराजवळील रस्त्याच्या कडेला भोंबोळी विक्रेत्यांची दुकाने सजतात. सकाळपासून विक्री करणाऱ्यांच्या अवती-भोवती लोकांची गर्दी नेहमी दिसून येते. वर्षातून एकदाच होणाऱ्या भोंबोळी खरेदीसाठी पुरूषांसह महिलांचीसुद्धा गर्दी दिसून येते.केवळ पावसाळ्यातील काही मोजक्या दिवसातच जंगली भागात उगवणाऱ्या या वनस्पतीची भाजी वर्षातून एकदा तरी खावी असा सल्लाही जाणकार देतात. शहरात आज ४०० रूपये प्रति किलो दराने भोंबोळीची विक्री होत आहे. मनोहर चौकात भोंबोळी घेऊन ग्रामीण भागातील महिला दुकाने थाटत असल्याने येथे भोंबोळीच्या चाहत्यांची हमखास गर्दी दिसून येते.भाव कितीही असो, मात्र या महिलांकडील माल हमखास विकला जातो, असाही रोजचा अनुभव आहे. यावरूनच भोंबोळीच्या चाहत्यांचा अंदाज बांधता येतो. (तालुका प्रतिनिधी) भोंबोळी शरीरासाठी पोषकभोंबोळी हा मशरूमचाच प्रकार आहे. शुद्ध मराठीत त्याला भूछत्र म्हटले जाते. पूर्ण उगवल्यावर त्याची छत्री तयार होते व त्यालाच ‘सात्या’ म्हटले जाते. ही एक प्रकारची वनस्पती असून तिच्यात प्रोटीन्स व कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्याने अतिशय चविष्ट व पोषक आहे. यासाठी वीज कडाडण्याची गरज नसते. परंतु यादरम्यान वातावरणातील नायट्रोजन (नत्र) जमिनीत गेल्याने ते उगविण्यासाठी पोषक वातावरण तयार होते. आर्द्रता, तापमान व प्रकाश मिळाल्यास भोंबोळी उगवते. वर्षातून एकदाच येणारी ही वनस्पती असून त्याचे सेवन करणे फायदेशीर असल्याचे वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक आणि आहारतज्ज्ञही सांगतात.