शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
5
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
6
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
7
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
8
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
9
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
10
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
11
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
12
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
13
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
14
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
15
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
16
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
17
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
18
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
19
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
20
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती

‘गावची शाळा-आमची शाळा’तून घडताहेत स्मार्ट विद्यार्थी

By admin | Updated: September 10, 2014 23:47 IST

जि.प. शाळांकडे पालकांचे व लोकप्रतिनिधींचे होणारे दुर्लक्ष पाहून जि.प.च्या शाळांतून देण्यात येणाऱ्या शिक्षणाची गुणवत्ता घसरली असा आरोप केला जात होता. मात्र या आरोपाला धुडकावून

अभियानाचे यश : भौतिक सुविधा व गुणवत्ता दुपटीने वाढली, जि.प.च्या शाळांना आले नवे रूपनरेश रहिले - गोंदियाजि.प. शाळांकडे पालकांचे व लोकप्रतिनिधींचे होणारे दुर्लक्ष पाहून जि.प.च्या शाळांतून देण्यात येणाऱ्या शिक्षणाची गुणवत्ता घसरली असा आरोप केला जात होता. मात्र या आरोपाला धुडकावून लावण्याचे काम गोंदियाच्या जिल्हा परिषदेने केले. १४ एप्रिल २०१४ मध्ये गोंदिया जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या ‘गावची शाळा आमची शाळा’ या उपक्रमाने जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागात शिक्षण घेणारा विद्यार्थीही आता ‘स्मार्ट’ होऊ लागला आहे.मागील दोन वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळांनी राबविलेल्या उपक्रमामुळे शाळांच्या भौतिक सुविधात वाढ झाली. विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा, उपक्रम यामुळे विद्यार्थ्याना बरेच काही शिकता आले. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात किंवा पडक्या इमारतींमध्ये जि.प.च्या शाळा भरत होत्या. मात्र आता सुंदर वातावरणात जि.प.चे विद्यार्थी विद्यार्जन करतात.गोंदिया जिल्हा परिषदेने जिल्हाभर राबविलेल्या ‘गावची शाळा आमची शाळा’ या उपक्रमात जिल्ह्यातील माध्यमिक शाळांपैकी प्रथम क्रमांकाची मानकरी आमगाव तालुक्याच्या ठाणा शाळा ठरली. या शाळेत विद्यार्थी संख्या २९६, शिक्षक संख्या १२ तर गावाची लोकसंख्या तीन हजार २१३ आहे. या शाळेची पटनोंदणी १०० टक्के होती. या शाळेने वर्षभरात मुलांसाठी बचत बँक, पालक मेळावा, पालकभेट, उपस्थिती झेंडा, विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा करणे, तारीख तो पाढा, स्मार्ट बॉय, प्रिटी गर्ल्स राबवून विद्यार्थ्यांमध्ये निटनेटकेपणा आणण्याचा प्रयत्न केला. एक क्षण स्वच्छतेचा, एकधागा समतेचा, सामान्य ज्ञानावर आधारीत प्रश्न मंजूषा, विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट, फिरता बगीचा, पाढे, हस्ताक्षर व रांगोळी स्पर्धा, बालसभा, महापुरूषांच्या जयंती, पुण्यतिथी, वनभोजन, स्रेहसंमेलन याशिवाय १५० सागणाचे झाडे लावण्यात आले. लोकसहभागातून शाळेसाठी पदाधिकाऱ्यांनी १४ हजार ९०० तर तर नागरिकांनी १५ हजार १५० रूपये दिले. या ३० हजार ५० रूपयातून खेळाडूंसाठी ड्रेस ४८०० रूपयातून, शालेय बागेवर १२ हजार १०० रूपये, विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनासाठी मेटींग मंडप ११ हजार ८०० रूपयातूनतयार केले. श्रमदानातून कुंपन तयार केले. सोबतच तीन हजार ४७५ रूपये खर्च करण्यात आले. या शाळेला प्रगाचातून प्रथम ५ हजार, तालुक्यातून प्रथम १३ हजार व जिल्ह्यातून प्रथम ४५ हजार असे एकूण ६३ हजार रूपये पुरस्कार म्हणून मिळाले. या शाळेला २०० पैकी १४७ गुण मिळाले. जिल्हास्तरावर शाळा प्रथम आणण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकुमार भेलावे, प्रमीला बिसेन, सरपंच गजानन मेश्राम, उपसरपंच अशोक बघेले, मुख्याध्यापक डी.टी. कावळे, शिक्षक के.टी. कारंजेकर, के.पी. रहमतकर, के.एल. पटले, बी.सी.डहाट, एस.एस. जांभूळकर, बी.डी. पुंडे, आर.डी. वाहने, ए.पी. बोपचे, पी.आर. पतेह, सी. वाय. वट्टी, व्ही.ए.बनसुडे, मिना राजू मंच व गावकऱ्यांनी सहकार्य केले.जिल्ह्यातून द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरलेल्या गोंदिया तालुक्यातील जि.प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा आसोली या शाळेची विद्यार्थी संख्या १५० तर शिक्षक संख्या सात आहे. सामान्य स्थितीत असलेल्या या शाळेच्या शिक्षकांनी मेहनत घेऊन गावची शाळा आमची शाळा या उपक्रमात शाळा बालस्रेही व आकर्षक, भौतिक सुविधा लोसहभागातून वाढविल्या. शालेय रंगरंगोटी, सजावट, वातावरण निर्मिती केल्यामुळे लोकांनी शाळेला केलेली मदत अडीच लाखाच्या घरात गेली.शैक्षणिक वातावरण निर्मीती करण्यास मदत झाली. पालक सभा,विद्यार्थ्याना मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे पालकांना शाळेबद्दल आपुलकी वाढू लागली. शालेय साहित्यांची नासधूस न करता त्यांची जपवणुक करण्याचे आवाहन केले होते. नाविन्यपुर्ण उपक्रमात विद्यार्थ्यांचा वाढदिवशी शुभेच्छा कार्ड देणे, उपस्थिती झेंडा, स्मार्ट बाय/गर्ल्स, शंभर टक्के उपस्थिती, दरमहिन्याला सामान्य ज्ञान स्पर्धा, चावडी वाचन, प्रवेशोत्सव, शाळेच्या सौंदर्यीकरणासाठी बाग तयार केली. चाईल्ड फेंडली एलीमेंट्स उपक्रम राबविण्यात आला. यातून शैक्षणिक गुणवत्ता विकास करण्यासाठी शाळेत डिजीटर कॅमेरे लावण्याची व आधुनिक संगणक कक्ष तयार करण्याची योजना तयार केली. विज्ञान प्रयोगशाळा, बालवाचनालय, स्वतंत्र स्वयंपाकगृह, क्रिडा जगत, परसबाग, शालेय पोषण आहारासाठी स्वतंत्र भांडारगृह, राजू मीना मंच, स्मार्ट बॉय, गर्ल्स, १०० टक्के उपस्थिती, सामान्य ज्ञान स्पर्धा, सहशालेय उपक्रम, बर्थ डे शुभेच्छा कार्ड, शिक्षणाची पालकी, शुध्द पिण्याच्या पाण्याची सोय, बालोद्यान, बोलका ओठा, योगपीठ, भोजनगृह तयार केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न केले. मुख्याध्यापक एन.जी. डहाके, शिक्षक के.व्ही. मानकर, एम.एस. चोपडे, के.एस. डोंगरवार, एन.बी.नेवारे, जे.एस. माहुले, ए.ए. सतदेवे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बिंदू मेश्राम, सरपंच सयाराम भेलावे, फिरोज बन्सोड यांचे सहकार्य लाभले. माजी जि.प. अध्यक्ष नेतराम कटरे व पं.स. सदस्य रामू चुटे यांचे मार्गदर्शन लाभले.