शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

गाळ उपसा योजना ठरणार वरदान

By admin | Updated: May 15, 2017 00:12 IST

पवन तलावातील २५ वर्षापासूनचा गाळ हा शेतीसाठी सोनखतच आहे. यामुळे शेतकऱ्यांनी हे सोनखत त्वरित घेऊन जावे व आपली शेतजमीन सुपीक करावी.

 अभिमन्यू काळे : पवन तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा प्रारंभ लोकमत न्यूज नेटवर्क गोरेगाव : पवन तलावातील २५ वर्षापासूनचा गाळ हा शेतीसाठी सोनखतच आहे. यामुळे शेतकऱ्यांनी हे सोनखत त्वरित घेऊन जावे व आपली शेतजमीन सुपीक करावी. शासनाची तलावातील गाळ उपसा ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदन ठरणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी ंंकेले. येथील पवन तलावातील गाळ उपसण्याच्या व योजनेच्या प्रारंभाप्रसंगी रविवारी (दि.१४) ते बोलत होते. यावेळी तहसीलदार कल्याणकुमार डहाट, उप विभागीय अधिकारी सिध्दार्थ भंडारे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, बीडीओ दिनेश हरिणखेडे, नगर पंचायतचे सर्व सदस्य, माजी उपसरपंच राहुल कटरे प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी गाळात कुदळ मारून व जेसीबीचे पूजन करून शासनाच्या गाळ उपसा योजनेचा शुभारंभ केला. नगर पंचायतच्या सरहद्दीत असलेल्या राधाकृष्ण मंदिराजवळील पवन तलाव हा फार पूर्वीपासूनचा तलाव असून या तलावाचे पाणी व परिसरातील जागेमध्ये घाण वाढल्यामुळे लगतच्या वस्तीत त्रास वाढला होता. त्यामुळे काही धार्मिक संघटना व युवा शक्तीच्या सहयोगाने लोकसहभागातून श्रमदानाच्या माध्यमातून पवन तलावाचे सौंदर्यीकरणाचे काम नगर पंचायतचे उपाध्यक्ष आशिष बारेवार यांनी १ जानेवारी २०१७ ला हाती घेतले. बघता-बघता तलावाच्या आजूबाजूचा कचरा साफ झाला. लोकसहभाग वाढत गेला. निसर्गरम्य वातावरणाची जाण होताच तलावाच्या परिसरात तीन बेंचेस लोकसहभागातून लावण्यात आले. शासनाची तलाव गाळ उपसा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली. गाळ काढून खोलीकरणाची एक दिवसाची जबाबदारी गायत्री परिवारने घेऊन व युवा शक्तीचे प्रणेते बारेवार यांनी तातडीने दोन जेसीबी लावून गाळ काढण्याची तयारी दर्शवून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या हस्ते गाळ उपसा योजनेचा पहिला तलाव पवन तलावचा गाळ उपसा योजनेचा शुभारंभ केला.