शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्लॅब कोसळली विद्यार्थी बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 20:43 IST

तालुक्यातील डवकी येथील जि.प. केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या इमारतीची स्लॅब कोसळल्याची घटना मंगळवारी सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने विद्यार्थ्यांना काही झाले नाही. मात्र या प्रकारामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

ठळक मुद्देडवकी जि.प. शाळेतील घटना : जीर्ण वर्गखोल्यात विद्यार्थ्यांना धडे

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : तालुक्यातील डवकी येथील जि.प. केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या इमारतीची स्लॅब कोसळल्याची घटना मंगळवारी सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने विद्यार्थ्यांना काही झाले नाही. मात्र या प्रकारामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.प्राप्त माहितीनुसार डवकी येथे जि. प. केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळा असून या शाळेची इमारत जीर्ण झाली आहे. मात्र याच जीर्ण वर्गखोल्यांमध्ये धोका पत्करुन विद्यार्थ्यांना धडे दिले जात आहे. मागील काही दिवसांपासून स्लॅबचे पोपडे पडत असून मंगळवारी स्लॅबचा मोठा भाग कोसळला. सुदैवाने यात विद्यार्थी आणि शिक्षकांना कुठलीच हाणी झाली नाही. मात्र ज्या ठिकाणी स्लॅबचा भाग कोसळला त्या ठिकाणी कुणीच बसले नव्हते अन्यथा मोठी घटना घडली असती. दरम्यान याप्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.दरम्यान मुख्याध्यपकांनी याची माहिती पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. विशेष म्हणजे शाळेची इमारत जीर्ण झाली असून शाळेच्या इमारतीची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी शालेय व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे केली होती. मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही.त्यामुळे धोका पत्थकारुन विद्यार्थ्यांना जीर्ण वर्गखोल्यांमध्ये धडे दिले जात आहे. जिल्हा परिषदेच्या जवळपास १३०० वर्गखोल्या जीर्ण झाल्या असून त्यांची त्वरीत दुरूस्ती करण्याची गरज आहे.यासाठी शाळा व शालेय व्यवस्थापन समित्यांनी अनेकदा जि. प. शिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी पाठपुरावा केला. मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आली. सुदैवाने मंगळवारी झालेल्या घटनेत कुठलीही जीवीतहानी झाली नाही. मात्र यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला इजा झाली असती तर त्याला जबाबदार कोण असा सवाल सुध्दा पालकांकडून केला जात आहे.शाळेच्या इमारतीची दुरूस्ती त्वरीत करण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाष्कर चौधरी, सरपंच उमराव बावणकर यांनी लोकमतशी बोलताना केली.केंद्र प्रमुखांनी केली पाहणीडवकी येथील जि.प.केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या इमारतीचे स्लॅब कोसळल्याची माहिती मुख्याध्यापक व शिक्षकांनी देवरी पंचायत समिती व केंद्रप्रमुखांना दिली. त्यानंतर केंद्रप्रमुख ई.एन.येळणे व एम.के.गेडाम यांनी शाळेला भेट देवून पाहणी केली.बांधकामावर प्रश्नचिन्हया शाळेच्या स्लॅबचे बांधकाम १० ते १२ वर्षांपूर्वी करण्यात आले होते. मात्र अल्पावधीत स्लॅबचे पोपडे पडण्यास सुरूवात झाली असून सलाखी बाहेर दिसत आहे. तर स्लॅबचा काही भाग सुध्दा हळूहळू कोसळत आहे. त्यामुळे या बांधकामात वापरण्यात आलेल्या साहित्यावर सुध्दा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.शिक्षण विभागाला केवळ उपक्रमांची काळजीकेवळ डवकी येथीलच नव्हे तर जिल्ह्यातील इतर जि.प.शाळांच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. ही बाब वांरवार जि.प.प्राथमिक शिक्षण विभागाच्या निदर्शनास जि.प.सदस्यांनी सुध्दा आणून दिली. मात्र शिक्षणाधिकाऱ्यांनी त्याची अद्यापही दखल घेतली. त्यांना केवळ विविध शैक्षणिक उपक्रम राबवून शाबासकीची थाप पाठीवर मिळवून घेण्यातच रस असून विद्यार्थ्यांच्या जीवाची कुठलीच काळजी नसल्याचे दिसून येते.आतातरी धडा घेणार का?डवकी येथील शाळेतील घटनेमुळे जि.प.शाळांच्या जीर्ण वर्गखोल्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आतातरी जि.प.शिक्षण विभाग व पदाधिकारी याची दखल घेवून जीर्ण वर्ग खोल्यांची दुरूस्ती करण्यासाठी पाऊल उचलणार का असा सवाल विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळा