शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

शाळा सोडलेल्यांसाठी आता ‘कौशल्य अभ्यासक्रम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 01:38 IST

आर्थिक परिस्थिती, सातत्याने रोजगारासाठी गावागावांतून फिरायला लागणे, शालेय अभ्यासक्रमातील अमुक एक विषय न जमणे अशा अनेक कारणांनी शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण

मुंबई : आर्थिक परिस्थिती, सातत्याने रोजगारासाठी गावागावांतून फिरायला लागणे, शालेय अभ्यासक्रमातील अमुक एक विषय न जमणे अशा अनेक कारणांनी शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडतात, पण या विद्यार्थ्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना कौशल्य शिकविण्यासाठी एसएनडीटी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. एसएनडीटी विद्यापीठाच्या प्रेमलीला विठ्ठलदास पॉलिटेक्निकमध्ये ‘प्रधानमंत्री कौशल्य विकास’ योजनेंतर्गत शालेय, महाविद्यालयीन ड्रॉप-आउट विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.प्रेमलीला विठ्ठलदास पॉलिटेक्निकमध्ये या योजनेंतर्गत मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी विभागातर्फे ‘इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन’ (बेसिक), अपरेल मॅनिफॅक्चर आणि डिजाइन विभागातर्फे ‘अपरेल फॅब्रिक चेकर’, ‘अपरेल फॅब्रिक कटर- अपरेल मेडअप आणि होम फर्निशिंग’, ‘अपरेल मेजरमेंट चेकर’, ‘अपरेल सुइंग मशिन आॅपरेटर’ आणि फार्मसी विभागातर्फे ‘फार्मसी असिस्टंट’ हे ६ विशेष कौशल्य आधारित अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत.इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन (बेसिक) आणि फार्मसी असिस्टंट या दोन अभ्यासक्रमांसाठी वयोमर्यादा १८ असून, १२वीपर्यंत शिक्षण घेतलेले असले पाहिजे. दोन्ही अभ्यासक्रमांची परीक्षा हेल्थकेअर सेक्टर कौन्सिलतर्फे घेण्यात येईल. अपरेल फॅब्रिक चेकर, अपरेल मेजरमेंट चेकर, अपरेल सुइंग मशिन आॅपरेटर या अभ्यासक्रमांसाठी वयोमर्यादा १८ असून, शिक्षणाची अट इयत्ता ५वी आहे. अपरेल फॅब्रिक कटर-अपरेल मेडअप आणि होम फर्निशिंगसाठी वयोमर्यादा १८ असून, शिक्षण १०वीपर्यंत झालेले असावे. या अभ्यासक्रमाच्या परीक्षा अपरेल सेक्टर कौन्सिलतर्फे घेण्यात येणार आहेत. कोर्सेस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी सहकार्य आणि स्वयंरोजगारविषयक सल्ला दिला जाणार असल्याचे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले.भारत सरकारने ‘प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना’ हा उपक्रम २४ लाख भारतीय तरुणांना, उद्योग व संबंधित कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्यासाठी सुरू केला आहे. या योजनेंतर्गत, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण आणि मूल्यांकन सरकारी प्रमाणपत्र देऊन केले जाणार आहे. जेणेकरून, त्यांना चांगले भविष्य व एक विशिष्ट कौशल्य आधारित नोकरी मिळण्यासाठी मदत मिळेल.तीन वर्षांत १० लाख विद्यार्थी घडविण्याचे लक्ष्यआॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या (एआयसीटीई) माध्यमातून पंतप्रधान कौशल्य विकास योजना तांत्रिक संस्थांमध्ये सुरू करण्यात आली आहे. एआयसीटीई मंजूर विद्यमान पायाभूत सुविधा असलेल्या सहअभियांत्रिकी व पॉलिटेक्निक अंतर्गत येत्या तीन वर्षांत १० लाख विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे लक्ष्य आहे.