शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मानधनासाठी वृद्धेची सहा वर्षांपासून पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 22:08 IST

निराधारांना आर्थिक आधार देण्यासाठी शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना सुरू करण्यात आली. मात्र प्रशासकीय दप्तर दिंरगाई व शासनाच्या धोरणामुळे या योजनेपासून लाभार्थ्यांना वंचित राहावे लागत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : जिल्हाधिकारी कार्यालयांने दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : निराधारांना आर्थिक आधार देण्यासाठी शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना सुरू करण्यात आली. मात्र प्रशासकीय दप्तर दिंरगाई व शासनाच्या धोरणामुळे या योजनेपासून लाभार्थ्यांना वंचित राहावे लागत आहे.प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील भागी (डवकी) येथील ताराबाई महादेव धरमशहारे या निराधार वृध्द महिलेचे मानधन २०१२ ते २०१८ या वर्षांपासून थकीत आहे. मात्र मागील सहा वर्षांपासून त्यांना या योजनेचे मानधन मिळाले नाही. ते मिळावे यासाठी त्या शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवित आहे. मात्र दगडाचे मन असणाऱ्या प्रशासनाला अद्यापही पाझर फुटलेला नाही. निराधार ताराबाई धरमशहारे यांना २०१२ ते २०१९ पर्यंत या योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित आहेत. या योजनेतंर्गत मिळणारे मानधन बंद झाल्याने ताराबाईला औषध आणि उदरनिर्वाहाचा खर्च करण्याची अडचण निर्माण झाली आहे.देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी नायब तहसीलदार के. टी. पराते यांना लवकरात लवकर काम करून देण्याचे आदेश दिले. मात्र यानंतरही ताराबाईचे मानधन देण्यात आले नाही. त्यामुळे तहसीलदारांच्या आदेशाला सुध्दा त्यांचे अधिनस्त कर्मचारी जुमानत नसल्याचे चित्र आहे.देवरी तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी त्यांची समस्या मार्गी लावत नसल्याने ताराबाईनी अखेर गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आपली आपबीती सांगितलीे. त्यांनंतर जिल्हा सहायक अधीक्षक यांनी देवरी तहसील कार्यालयाला पत्र देऊन योग्य कारवाही करुन प्रकरण मार्गी लावण्याचे निर्देश दिले आहे.सध्या निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे दुसरी कामे सुरू आहे. ताराबाई धरमशहारे यांचे प्रकरण लवकरच मार्गी लावण्यात येईल.- के. टी. पराते, नायब तहसीलदार देवरी

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी