शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

सहा गावांना साथरोगांचा धोका

By admin | Updated: July 18, 2016 00:10 IST

पाण्यात पाहिजे त्या प्रमाणात क्लोरीन नसल्याने जिल्ह्यातील तीन तालुक्यातील सहा गावांत जलजन्य आजार पसरण्याची शक्यता आहे.

गोंदिया : पाण्यात पाहिजे त्या प्रमाणात क्लोरीन नसल्याने जिल्ह्यातील तीन तालुक्यातील सहा गावांत जलजन्य आजार पसरण्याची शक्यता आहे. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेतील अहवालाच्या आधारावरून ही बाब उघडकीस आली आहे. यावरून या गावांत निकृष्ट दर्जाचे ब्लिचींग पावडर वापरण्यात आल्याचे स्पष्ट होते. पाण्याची गुणवत्ता सोबतच जलजन्य आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जलस्त्रोतांमध्ये ब्लिचींग पावडरचा उपयोग ग्रामपंचायत कडून करण्यात येतो. त्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी प्रत्येक महिन्याला जिल्हा प्रयोगशाळेत केली जाते. या पाण्यामध्ये ३३ टक्के क्लोरीन अपेक्षित आहे. मात्र जिल्ह्यातील आमगाव, गोरेगाव व सडक-अर्जुनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सहा गावांतील पाण्याच्या स्त्रोतांमध्ये २० टक्क्यांपेक्षा कमी क्लोरीन आढळून आले आहे. यावरून या गावांत निकृष्ट दर्जाचे ब्लीचिंग पावडर वापरण्यात आल्याचे दिसले. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत जून महिन्यात पाण्याचे नमूने घेण्यात आले. यात आमगाव पंचायत समितीच्या ठाणा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या चिरचाळबांध मध्ये ७.७५ टक्के, बासीपार येथे १७.०४ टक्के, गोरेगाव पंचायत समितीच्या सोनी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या म्हसगाव येथे १६.६८ टक्के, घोटी येथे ७.७५ टक्के, सडक-अर्जुनी पंचायत समितीच्या पांढरी प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत येणाऱ्या गिरोला येथे १२.४३ टक्के व चिचटोला येथे १५.६ टक्के क्लोरीन आढळले. जिल्हा प्रयोगशाळेत ठाणा प्राथमिक आरोग्य केंद्रातून ६, सोनी प्राथमिक आरोग्य केंद्रातून ८, पांढरी आरोग्य केंद्रातून ६ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यात ठाणाचे ३, सोनी २ व पांढरी चे २ नमून्यांमध्ये २० टक्यांपेक्षा कमी क्लोरीन आढळले. (तालुका प्रतिनिधी)