शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी सुट्ट्यांसाठी धावणार सहा ‘समर स्पेशल’ ट्रेन

By admin | Updated: June 9, 2017 01:25 IST

उन्हाळी सुट्ट्यांदरम्यान रेल्वेगाड्यांमध्ये होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी व प्रवासी सुविधांना लक्षात घेवून

अतिरिक्त गर्दी होणार कमी : दपूम रेल्वेची प्रवासी सुविधालोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उन्हाळी सुट्ट्यांदरम्यान रेल्वेगाड्यांमध्ये होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी व प्रवासी सुविधांना लक्षात घेवून रेल्वे प्रशासनाद्वारे सहा स्पेशल गाड्यांची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. सदर माहिती दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक यांनी दिली आहे.यात कामाख्या-पुणे-कामाख्या साप्ताहिक सुविधा स्पेशल ट्रेन कामाख्यावरून पुणेसाठी १२ ते २६ जूनपर्यंत एकूण तीन फेऱ्यांसाठी चालविण्यात येणार आहे. तर पुणे ते कामाख्यासाठी ८ ते २९ जूनपर्यंत एकूण चार फेऱ्यांसाठी चालविण्यात येणार आहे. ही गाडी कामाख्या ते पुणेसाठी (८२५०६) या क्रमांकासह दर सोमवारी कामाख्यावरून रात्री ११ वाजता रवाना होईल व पुणे येथे प्रत्येक गुरूवारी रात्री २.४५ वाजता पोहोचेल. तसेच पुणेवरुन कामाख्यासाठी (८२५०५) या क्रमांकासह प्रत्येक गुरूवारी सकाळी १०.३० वाजता रवाना होईल व कामख्या येथे प्रत्येक शनिवारी दुपारी ३.५५ वाजता पोहोचेल. सियालदाह-लोकमान्य तिलक-सियालदाह साप्ताहिक सुपरफास्ट एसी समर स्पेशल ट्रेन प्रत्येक रविवारी सियालदाहवरून लोकमान्य तिलकसाठी ११ ते २५ जूनपर्यंत (०२२५५) या क्रमांकासह तसेच प्रत्येक मंगळवारी लोकमान्य तिलक ते सियालदाहसाठी १३ ते २७ जूनपर्यंत (०२२५६) या क्रमांकासह धावेल. या स्पेशल ट्रेनमध्ये एसी-२ चे चार कोच, एसी-३ चे ९ कोच व दोन पॉवरकारसह एकूण १५ कोच राहतील.सोमनाथ-पुरी-सोमनाथ ही समर स्पेशल ट्रेन सोमनाथ व पुरी दरम्यान साप्ताहिक स्पेशल ट्रेन आठ फेऱ्यांसाठी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. ही गाडी प्रत्येक शनिवारी सोमनाथवरून पुरीसाठी १० जून ते १ जुलैपर्यंत (०९२०८) या क्रमांकासह धावेल. तसेच याच प्रकारे विरूद्ध दिशेतसुद्धा प्रत्येक बुधवारी पुरी ते सोमनाथसाठी ७ जून ते ५ जुलैपर्यंत (०९२०८) या क्रमांकासह चालेल. या स्पेशल ट्रेनमध्ये एसी-२ चा एक कोच, एसी-३ चे दोन कोच, स्लिपरचे ८ कोच, सामान्य ४ व एसएलआरडीच्या दोन कोचसह एकूण १७ कोच राहतील. बिलासपूर-पुणे-बिलासपूर साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल गाडी बिलासपूर-पुणे-बिलासपूर दरम्यान चालवण्यात येत आहे. ही गाडी बिलासपूरवरून ७ ते २८ जूनपर्यंत प्रत्येक बुधवारी (०२०४४) क्रमांकासह तथा पुणेवरून १३ ते २७ जूनपर्यंत प्रत्येक मंगळवारी (०२०४३) या क्रमांकासह धावेल. संतरागाछी-राजकोट-संतरागाछी दरम्यान समर स्पेशल ट्रेन सांतरागाछीवरून (०२८३४) या क्रमांकासह प्रत्येक शुक्रवारी ९ ते ३० जूनपर्यंत राजकोटसाठी धावेल. तसेच विरूद्ध दिशेत राजकोटवरून ही गाडी (०२८३३) या क्रमांकासह प्रत्येक रविवारी ११ जून ते २ जुलैपर्यंत सांतरागाछीसाठी चालेल. या गाडीत दोन जनरेटर कार व १४ एसी-३ कोचसह एकूण १६ कोच राहतील. संतरागाछी-पुणे-संतरागाछी दरम्यान समर स्पेशल ट्रेन चालेल. ही साप्ताहिक एसी सुपरफास्ट गाडी आहे. ही गाडी सांतरागाछीवरून प्रत्येक शनिवारी (०२८२२) क्रमांकासह १० ते २४ जूनपर्यंत चालेल. पुणेवरून प्रत्येक सोमवारी (०२८२१) क्रमांकासह १२ ते २६ जूनपर्यंत चालेल. या एसी स्पेशल ट्रेनमध्ये तीन एसी-२, आठ एसी-३ सह एकूण ११ कोच राहतील.