शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

रेलटोलीतून सहा धारदार हत्यारे जप्त

By admin | Updated: May 10, 2017 01:03 IST

रामनगर पोलिसांनी रेलटोली परिसरात सहा धारदार हत्यार (कोयते) घेऊन जाणाऱ्या तरुणांपैकी एकाला अटक केली.

एकास अटक : घातपाताचा डाव उधळला, तीन फरार लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : रामनगर पोलिसांनी रेलटोली परिसरात सहा धारदार हत्यार (कोयते) घेऊन जाणाऱ्या तरुणांपैकी एकाला अटक केली. तर तीन आरोपी फरार झाले. ही कारवाई सोमवारच्या रात्री १०.४५ वाजता शहराच्या रेलटोली परिसरात करण्यात आली. रामनगर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार श्रीराम भोंडे (४५) हे रात्रगस्त घालत असताना त्यांना मोटार सायकल एमएच ३५-व्ही ४७७० व एमएच ३५-आर-४१२४ वर सहा कोयते घेऊन जात असताना चार तरुण दिसले. त्यांनी त्या तरुणांच्या मोटार सायकलला थांबविले. यावेळी त्यांनी दिनेश सदाशिव राऊत (२५) याला पकडले. तर तीन आरोपी फरार झाले. सदर आरोपी जवळून सहा कोयते, दोन मोटारसायकल जप्त केल्या. रामनगर पोलिसांनी सदर आरोपी विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५ अन्वये गुन्हा दाखल केला. अटक आरोपी दिनेश राऊत याला विचारणा केली. फरार असलेल्या आरोपींमध्ये राजू दुबे, राजा उर्फ शादाब खान व गुड्डा हे तिघे असल्याचे सांगितले. त्या आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. घातपात करण्यासाठी सदर कोयते घेऊन जात असल्याने या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न पोलिसांचा आहे. गोंदियात पुन्हा गँगवार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी पोलिसांना अलर्ट राहण्याची गरज आहे.