शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलमध्ये सुरु होणार सहा पीजीचे अभ्यासक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 22:21 IST

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) सुरू होवून तीन वर्षांचा कालावधी लोटला आहे. यानंतर आता मेडिकल कौन्सील आॅफ इंडियाने नुकतीच या महाविद्यालयातील एमबीबीएस चौथ्या वर्षाच्या अभ्यासक्रमाला मंजुरी दिली. तसेच सहा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी सुध्दा मंजुरी दिली आहे.

ठळक मुद्देतज्ज्ञ डॉक्टर होणार उपलब्ध : रुग्णांवर उपचारासाठी होणार मदत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) सुरू होवून तीन वर्षांचा कालावधी लोटला आहे. यानंतर आता मेडिकल कौन्सील आॅफ इंडियाने नुकतीच या महाविद्यालयातील एमबीबीएस चौथ्या वर्षाच्या अभ्यासक्रमाला मंजुरी दिली. तसेच सहा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी सुध्दा मंजुरी दिली आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वरुपात वैद्यकीय महाविद्यालयाला तज्ज्ञ डॉक्टर सुध्दा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे ही बाब जिल्हावासीयांसाठी आनंदाची आहे.गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर पदव्युत्तर सीपीएस अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी एमसीआयची मंजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे हे अभ्यासक्रम येथे सुरू झाले नव्हते. मात्र एमसीआयने एमबीबीएसच्या चौथ्या वर्षाच्या अभ्यासक्रमाला मंजुरी दिल्यानंतर शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्य विभागाने १४ मे रोजी कॉलेज आॅफ फिजीशीयन व सर्जन बॉम्बे परळ मुंबई या संस्थेचे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्य विभागाने मंजुरी दिली आहे.भारतीय आयुर्विज्ञान परिषद अथवा महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या मान्यता प्राप्त अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्त्री रोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, कान, नाक, घसारोग तज्ज्ञ, सोनोग्राफी तज्ज्ञ आणि अस्थीरोग तज्ज्ञ विषयाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे.यासाठी प्रवेशाची क्षमता सुध्दा वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाने निश्चित करुन दिली आहे. यामुळे हा अभ्यासक्रमासाठी बाहेरुन डॉक्टर येतील.शिक्षणासह ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सेवा सुध्दा देतील त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाला तज्ज्ञ डॉक्टर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बरेचदा तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांना नागपूर येथे रेफर केले जाते. अथवा रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात जावे लागते. मात्र आता ही अडचण पूर्णपणे दूर झाली आहे.त्यामुळे ही बाब जिल्हावासीयांसाठी निश्चितच दिलासा दायक आहे.याच सत्रापासून प्रवेशएमसीआय आणि शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्य विभागाने येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सीपीएस अभ्यासक्रम सुरू करण्याला १४ मे रोजी मंजुरी दिली आहे. त्यामुळे हा पदव्युत्तर अभ्यासक्रम याच शैक्षणिक सत्रापासून सुरू केला जाणार आहे.एमसीआय आणि शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्य विभागाने वैद्यकीय महाविद्यालयात सीपीएस अभ्यासक्रम सुरू करण्याला मंजुरी दिली आहे. यामुळे महाविद्यालयाला तज्ज्ञ डॉक्टर मिळणार असून त्याची रुग्णांना सुध्दा मदत होईल.- व्ही.पी.रुखमोडेअधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया.

टॅग्स :Medicalवैद्यकीय