शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांचा जमा-खर्च ग्रामसभेत मंजूर

By admin | Updated: December 5, 2015 09:07 IST

ग्रामपंचायत सावरी येथे २ डिसेंबरला सर्वसाधारण तहकूब सभा भरली. यात एकूण आठ विषयांवर चर्चा करण्यात आली.

सावरी ग्रामपंचायतची पारदर्शकता : एकूण जमा ४ लाख ४४ हजार १९९ रूपयेरावणवाडी: ग्रामपंचायत सावरी येथे २ डिसेंबरला सर्वसाधारण तहकूब सभा भरली. यात एकूण आठ विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच मागील सहा महिन्यांत जमा रक्कम ४ लाख ४४ हजार १९९ रूपयांमधून ३ लाख ५४ हजार ३६४ रूपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली.तहकुब ग्रामसभा असल्याने सभेला कोरमची आवश्यकता नव्हती. अध्यक्षस्थानी आर.जी. गजभिये यांची निवड करण्यात आली. सुरूवातीला मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. त्यात संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबविणे, सन २०१५-१६ वर्षात राज्य ग्रामीण आराखडा तयार करताना अभिषरणाचा अवलंब करणे, प्लास्टिक बंदी, पर्यावरण नियोजन अंतर्गत कुटुंबातील मुलगा किंवा मुलगी जन्मास आल्यास एक झाड लावून त्याचे संगोपन करणे, मामा तलाव खोलीकरण करणे या मागील विषयांना कायम करण्यात आले.यानंतर जून ते नोव्हेंबर २०१५ पर्यंतचा सहामाही जमाखर्च मंजूर करण्यात आला. यात घर कर, दिवा कर, आरोग्य कर, सरपंच मानधन, कर्मचारी किमान वेतन, जमीन महसूल, दाखला फी व मवेशी लिलाव या बाबींचा समावेश आहे. यात एकूण जमा ४ लाख ४४ हजार १९९ रूपये व खर्च ३ लाख ५४ हजार ३६४ रूपये दाखवून मंजुरी देण्यात आली. पाणी पुरवठा योजनेत १ लाख ६२ हजार ७२८ रूपये जमा तर खर्च १ लाख ४१ हजार ६२८ रूपये, १३वा वित्त आयोग जमा ४ लाख ५२ हजार २३९ रूपये तर खर्च ३ लाख ४३ हजार ००४ रूपये, मग्रारोहयो जमा ४ लाख ३५ हजार ७३६ रूपये तर खर्च ३ लाख ६३ हजार ४५६ रूपये, ग्राम आरोग्य पाणी पुरवठा जमा २२ लाख २६ हजार ८५७ रूपये तर खर्च १२ लाख २२ हजार ०४७ रूपये दाखविण्यात आले आहे. तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध योजनेंतर्गत जमा दोन हजार ७७७ रूपये व त्याचा व्याज ०.०५४ रूपये, बीआरजीएफ योजनेंतर्गत जमा एक हजार २०६ रूपये व त्याचा व्याज ०.२६३ रूपये तसेच ग्रामस्तर कार्य समिती जमा ११ हजार ४१० रूपये व त्याचा व्याज ०.४३७ रूपये जमा झाला आहे. सदर तीन योजनेत काहीही खर्च झाले नाही. यानंतर सन २०१६ च्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली.विषय पाचनुसार खासगी पाणीपट्टी दर (नळ जोडणी) ५० रूपयांवरून ८० रूपये करण्यात आली. यानंतर कृषी, समाजकल्याण, बॉयोगॅस, महिला बालकल्याण, रोजगार हमी योजना, स्वच्छ भारत, पर्यावरण, ग्लोबल वार्मिंग, स्वच्छता अभियान व वृक्ष लागवड आदी शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. यानंतर लाभार्थीस्तर उपसमित्या अंतर्गत संयुक्त वन व्यवस्थापन समिती, सार्वजनिक काम समिती, ग्राम आरोग्य पोषण व पाणी पुरवठा तसेच स्वच्छता समिती गठित करण्यात आली. अध्यक्षांच्या परवानगीने ज्या व्यक्तींना व्यापारासाठी दोन दुकान गाळे देण्यात आले, त्यांना एकच दुकान गाळे देऊन दुसऱ्या व्यक्तीला एक दुकान गाळे देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार ग्रामविकास अधिकारी के.एस. शेंदूरकर यांनी केले.(प्रतिनिधी)